अंबाजोगाई

‘दोन थेंब जिवनाचे’, पोलिओ निर्मुलन काळाची गरज – लसीकरणाच्या शुभारंभाप्रसंगी जि. प. अध्यक्षा शिवकन्याताई सिरसाट यांचे प्रतिपादन


घाटनांदूर, दि. 31 (लोकाशा न्यूज) : एखादा बालक ,व्यक्ती दिव्यांग असला तर आपण हिणवतो मात्र केवळ जनजागृती व समज नसल्यामुळे लसीकरण न केल्याने त्याल्या दिव्यांग आयुष्य जगावे लागत आहे . याला टाळण्यासाठी लसीकरण अतिशय आवश्यक असल्याचे जि. प. अध्यक्षा सौ शिवकन्याताई शिवाजी सिरसाट यांनी सांगीतले.
घाटनांदूर येथील प्रा आ केंद्रात दि 31 जानेवारी रविवारी सकाळी 8- 30 वाजता पल्स पोलिओ लसीकरणाचा शुभारंभ करण्यात आला त्या प्रसंगी सौ सिरसाट अध्यक्षपदावरून बोलत होत्या तर प्रमुख अतिथी सरपंच ज्ञानोबा जाधव,उपसरपंच बाळासाहेब देशमुख, प स सदस्य मच्छींद्र वालेकर,ता वै अ डॉ बालासाहेब लोमटे,माजी उपसरपंच प्रा सुरेश जाधव,तंटामुक्ती अध्यक्ष शेख मुक्तार वै अ डॉ माऊली मुंडे,वै अ डॉ विलास घोळवे .आदी उपस्थित होते. पुढे बोलताना जि प अध्यक्षा सौ शिवकन्याताई सिरसाट म्हणाल्या की भविष्यातील संभाव्य आजार टाळण्यासाठी गरोदर माता,बालक यांचे लसीकरण अतिशय महत्वाचे असून आरोग्य विभागाप्रमाणेच नागरिक माता पालक यांनी सचेत राहीले पाहीजे .आजचे बालक देशाचे भविष्य आहेत . ते सुद्रढ राहीले तरच देशाचे भवितव्य उज्वल राहील असे सांगत कोविड व्हॅक्सीन च्या बाबतीत कुठलीही शंका न घेता न भिता व्हॅक्सीन लस घ्यावी असे आवाहनही त्यांनी या प्रसंगी केले. सर्व प्रथम दिप प्रज्वलन , प्रतिमा पुजन करून त्यानंतर मान्यवरांचे शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देवून वै अ डॉ माऊली मुंडे,डॉ विलास घोळवे,श्रीमती शेख,श्रीमती मस्के,श्रीमती गित्ते,श्रीमती वीर,सर्वश्री प्रकाश जाधव,गणेश शिंदे,पाशाभाई पठाण,सर्व आशा स्वंयसेविका,दिक्कत,बिक्कड,आदींनी स्वागत केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार वै अ डॉ ज्ञानोबा मुंडे यांनी मानले.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!