


शिरूर, दि. 25 : वारकरी संप्रदायाच्या पारमार्थिक वाटचालीत महत्वपूर्ण योगदान देणारे संत श्री खंडोजी बाबा महाराज यांचा 17 वा पुण्यतिथी सोहळा सोमवारी शिरूर तालुक्यातील लोणी येथे उत्साहात पार पडला. संत महतांची भूमी म्हणून परिचित असलेल्या आपल्या जिल्ह्याने संतांची शिकवण जपण्याची परंपरा कोरोनाच्या संकटात कायम ठेवली ही बाब निश्चित समाधानकारक असल्याचे मत खा. प्रीतमताईंनी व्यक्त केले आहे. लोणीतील या सोहळ्याला त्यांनी हजेरी लावली, यावेळी त्या बोलत होत्या. खंडोजी बाबा महाराजांच्या पुण्यतिथी निमित्त आयोजित सप्ताहाने पंचक्रोशीत अत्यंत भक्तीमय वातावरण निर्माण झाले आहे, या सांप्रदायिक वातावरणात सहभागी होऊन ह.भ.प निवृत्ती महाराज इंदोरीकर यांच्या सुश्राव्य कीर्तनाचा लाभ घेतला असल्याचेही त्यांनी यावेळी म्हटले.