शिरूर

अल्पवयीन मुलीवर चुलत्याने केला अत्याचार


शिरूर दि. 7 (लोकाशा न्यूज) शिरूर कासार तालुक्यातील पौंडुळ येथे एका तेरा वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी शिरूर कासार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.
या बाबतीत मिळालेली माहिती अशी की, शिरूर तालुक्यातील पौंडुळ क्र. 3 या गावामध्ये तेरा वर्षाची अल्पवयीन मुलगी रविवारी दुपारनंतर किराणा सामान आणण्यासाठी गेली होती. तिला सख्या चुलत
चुलत्याने बोलावून घेऊन, तुला तुझ्या आजी आजोबाने बोलावले आहे म्हणून सांगितले. त्या प्रमाणे ति आली डोंगरावर गेल्यानंतर कोणीच नसल्याचे पाहून त्याने अतिप्रसंग केला. शिरूर पोलीस ठाण्यात पिडीतेच्या
वडिलांच्या फिर्यादीवरून बाळू भीमा पवार या आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उप निरीक्षक मनोज बरूरे हे करीत असुन आरोपी फरार झाला आहे.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!