शिरूर

शिंगारवाडीतील विवाहितेवर बलात्कार

चकलांबा ठाण्यात गुन्हा दाखल, आरोपीला पोलिसांनी केली गजाआड


गेवराई, दि. 21 (लोकाशा न्यूज) : सोशल मीडियावर फोटो व्हायरल करण्याची धमकी देत एका 28 वर्षीय विवाहितेवर गावातीलच एकाने बलात्कार केल्याची घटना चकलांबा पोलिस ठाणे हद्दीतील शिंगारवाडी येथे घडली. याप्रकरणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
याबाबत प्रकरणी पोलिस सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, चकलांबा पोलिस ठाणे हद्दीतील व शिरूर कासार तालुक्यातील शिंगारवाडी येथील विवाहित महिलेस (वय 28 वर्ष) याच गावातील नाते संबंधातील आरोपी विक्रम काळे याने सोशलमिडीयावर फोटो अपलोड करण्याची धमकी दिली. तसेच शेतामध्ये काम करत असताना जवळ कोणी नसल्याची संधी साधुन तिच्यावर लैंगिक अत्याचार केला असल्याची फिर्याद पीडीत महिलेने चकलांबा पोलीसांत दिली आहे. याप्रकरणी आरोपी विक्रम काळे याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीस चकलांबा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस उपनिरिक्षक ए.डी. भोसले या करत आहेत.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!