शिरूर

पोटच्या दारुड्या मुलाने केला बापाचा खून ; बीड जिल्ह्यातील घटना


शिरूर, बीड जिल्ह्यात दिवसेंदिवस आई वडिलांवर हल्ला करण्याच्या घटना वाढत असून महिनाभरातील अशी तिसरी घटना समोर आली आहे . दारू पिऊन घरी आल्याबद्दल जाब विचारल्याच्या रागातून चिडलेल्या मद्यधुंद पोराने बापावर चाकू हल्ला केला . या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या पित्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे .
शिरूर कासार तालूक्यात लिंबा येथे ही घटना घडली . दारुड्या मुलावर शिरुर का . पोलिसात ( Police ) खुनाचा ( Murder ) गुन्हा नोंद झाला आहे . गणेश बाबासाहेब नागरगोजे ( वय 50 ) रा . लिंबा , ता . शिरूर का . असे मृत व्यक्तीचे नाव आहे . गणेश नागरगोजे यांचा मुलगा स्वामी यास दारूचे व्यसन आहे . मंगळवार ( 13 जुलै ) रोजी दुपारी 4 वाजताच्या सुमारास स्वामी दारू पिऊन घरी आला . त्यामुळे गणेश यांनी त्याला दारू पिऊन घरी का आलास असा जाब विचारला आणि त्याची कानउघडणी केली .
वडिल रागावल्याने संतापलेल्या स्वामीने थेट चाकूने बापावर हल्ला चढविला आणि कपाळावर , खांद्यावर चाकूने वार केले . या हल्ल्यात गणेश गंभीर जखमी झाले . त्यांच्यावर उपचार सुरू असताना मंगळवारी दि .20 जुलै दुपारी दिड वाजता त्यांचा मृत्यू झाला . या प्रकरणी पोलीस हवालदार हरी जाधव यांनी शिरूर पोलीस ( Police ) ठाण्यात फिर्याद नोंदवली आहे . सदर फिर्यादीवरून स्वामी गणेश नागरगोजे याच्यावर खुनाचा ( Murder ) गुन्हा नोंद करण्यात आला आहे .

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!