मराठवाडा

मी मुंडे साहेबांची अपूर्ण लढाई लढणार आहे : पंकजाताई मुंडे

Adhikrao Dive Patil

औरंगाबाद, दि.25 :

स्व. गोपिनाथ मुंडे यांची अपूर्ण लढाई मी लढणार आहे. ओबीसी समाजाची जनगणना झाली पाहिजे. कोणत्याही पदावर नसताना ही चळवळ मला लढायची आहे, अशी भूमिका भाजपा नेत्या पंकजाताई मुंडे यांनी व्यक्त केली.

औरंगाबाद येथे प्रसारमाध्यमांशी त्यांनी संवाद साधला. यावेळी मुंडे बोलत होत्या. “ओबीसीची जनगणना झाली पाहिजे ही भूमिका गोपीनाथ मुंडे यांनी वेळोवळी मांडली. प्रीतम मुंडे यांनीदेखील संसदेत आवाज उठवला आहे. आता जनगणना होणार आहे, जनगणना होत असताना ती पाऊलं सकारात्मक पडली पाहिजेत. जातीनिहाय जनगणना झाली पाहिजे. याच्यात प्रत्येत गोष्टी रडारवर येतील आणि स्पष्ट होतील. त्या समुदायाला न्याय देण्यासाठी मदत होईल,” असं पंकजाताई मुंडे यांनी यावेळी सांगितलं.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!