पाटोदा

डीवायएसपी राहूल आवारेंच्या मॉलमध्ये चोरट्यांनी मारला डल्ला, लग्नाचा मुहूर्त साधत एक ते दीड लाख रुपयांचा माल लंपास

पाटोदा, डीवायएसपी आणि प्रसिद्ध कुस्तीपटू राहूल आवारे यांच्या मालकीच्या मॉलमध्ये रात्री चोरीची घटना घडली असून यामध्ये चोरट्याने दुकानातील एक ते दीड लाख रुपयांचा किराणा चोरून नेला. या प्रकरणी पाटोदा पोलिस ठाण्यामध्ये अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राहूल आवारे यांच्या मालकीचे पाटोदा-नगर रोडवर आर.के. मार्ट नावाचे मॉल आहे. रात्री अज्ञात चोरट्यांनी या मॉलचे कुलूप तोडून आतमध्ये प्रवेश केला. आतील एक ते दीड लाख रुपयांचे साहित्य अज्ञात चोरट्यांनी चोरून नेले. त्याचबरोबर सीसीटीव्ही कॅमेर्‍याचे साहित्यही चोरून नेल्याचे समोर आले. या प्रकरणी पाटोदा पोलिसात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काल 3 जानेवारी रोजी राहुल आवारेंचा विवाह पुण्यात पार पडला पण त्यांच्या मालकीचे दुकान फोडून लग्नाचा मुहूर्त साधला आहे.
सदर दुकानाचे दोन दिवसांपूर्वी उदघाटन करण्यात आले होते.त्यानंतर 3 जानेवारी रोजी त्यांचा पुण्यात लग्न समारंभाचा कार्यक्रम होता.नेमक्या या दिवसाचे औचित्य साधून चोरट्यांनी त्यांचे दुकान फोडले.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!
Join WhatsApp Group