देश विदेश

भारताविरोधात कुरघोड्या करणार्‍या पाकिस्तानची लागली वाट, एक अंडा 30 रूपयांना, अद्रकीच्या एका किलोचा भाव हजार रूपयांच्या घरात, साखर शंभरीपार; गहू साठ रूपये किलो


दिल्ली, दि. 23 : पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान नव्या पाकिस्तानची घोषणा देत सत्तेवर आले. ते सत्तेवर आल्यापासूनच पाकिस्तानची अर्थव्यवस्था एवढी कोलमडली आहे, की आता तेथे एका अंड्यासाठी तब्बल 30 रुपये मोजावे लागत आहेत. एवढेच नाही, तर अद्रकाचा भाव तब्बल 1000 रुपये किलोवर पोहोचला आहे. तर गहू 60 रुपये किलो झाला आहे. हे सर्व पाकिस्तानच्या बुडत्या अर्थव्यवस्थेचे प्रतीक बनले आहे आणि महागाई रोजच्या रोज नवा विक्रम नोंदवत आहे.
पाकिस्तानची परिस्थिती एवढी बिकट झाली आहे, की तेथे डझनाच्या भावाने अंडे घेतले तर तब्बल 240 रुपये मोजावे लागत आहेत. तसेच केवळ एक अंडा विकत घ्यायचा असेल तर 30 रुपये मोजावे लागत आहेत. महागाईचा फटका केवळ पेट्रोललाच बसला, असे नाही. तर येथील अधिकांश राज्यांत चिकनचा भावही 300 रुपये किलो एवढा झाला आहे येथे दैनंदिन जीवनावश्यक वस्तूंच्या किमतींनीही शिखर गाठले आहे. पाकिस्तानात अद्रकाचा भाव 1000 रुपये किलोवर पोहोचला आहे. तर साखर 104 रुपये किलो झाली आहे.  भयानक गोष्ट ही, की घरगुती गॅस संकटाचा सामना करत असलेल्या इम्रान खान यांच्या नव्या पाकिस्तानाताली जनता दोन वेळच्या अन्नासाठीही त्रस्त झाली आहे. पाकिस्तानातील 25 टक्के जनता ही दारिद्र्य रेषेखाली आहे. ऐन थंडीच्या दिवसांतच येथे अंडी आणि अद्रकाच्या भावाने आसमान गाठले आहे. येथे गव्हाचा भावच 60 रुपये किलो झाल्याने गव्हाच्या पिठाचे दरही मोठ्या प्रमाणावर वाढले आहेत.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!