देश विदेश

कोरोनाचा नवा प्रकार आढळल्यानंतर WHO कडून महत्वाची माहिती

दिल्ली,दि.२२ (लोकाशा न्यूज) : ब्रिटनमध्ये करोनाचा नवा प्रकार आढळल्याने इतर सर्व देशांनी खबरदारी घेण्यास सुरुवात केली आहे. वेगाने पसरणारा करोनाचा हा नवा प्रकार चिंता वाढवत असतानाच जागतिक आरोग्य संघटनेकडून (WHO) महत्वाची माहिती देण्यात आली आहे. करोनाचा नवा प्रकार अद्यापही अनियंत्रित झालेला नसून योग्य उपाययोजना करत तो रोखला जाऊ शकतो असं आरोग्य संघटनेने सांगितलं आहे. एएफपीने यासंदर्भात वृत्त दिलं आहे.
“करोना संकटात अनेकदा आपण कठीण परिस्थितीला सामोरं गेलो असून परिस्थितीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवलं आहे. सध्याची परिस्थितीही नियंत्रणाबाहेर नाही. पण याचा अर्थ आपण हातावर हात ठेवून बसू शकत नाही,” असं जागतिक आरोग्य संघटनेचे आपातकालीन प्रमुख मायकल रायन यांनी सांगितलं आहे.याआधी ब्रिटनचे आरोग्य सचिव मॅट हॅनकॉक यांनी करोनाचा नवा प्रकार नियंत्रणाबाहेर असल्याचा दावा करत मुख्य विषाणूंच्या तुलनेत ७० टक्के जास्त संसर्गाचा धोका असल्याचं सांगितलं होतं. “सध्या ज्या उपाययोजना केल्या जात आहेत त्या अगदी योग्य आहेत,” असं मायकल रायन यांनी सांगितलं आहे. करोनाचा नवा प्रकार आढळल्यानंतर जवळपास ३० देशांनी ब्रिटन आणि दक्षिण आफ्रिकेमधून प्रवास करणाऱ्यांसाठी आपली सीमा बंद केली आहे. मायकल रायन यांनी करोना रोखू शकतो पण त्यासाठी जास्त कष्ट घेण्याची गरज असल्याचं अधोरेखित केलं आहे. “जरी करोनाचा प्रसार वेगाने होत असला तरी तो रोखला जाऊ शकतो,” असं ते म्हणाले आहेत.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!