मराठवाडा

आघाडीची वर्षपुरती!सर्वच ठिकाणी राज्य सरकार ठरले अपयशी, भाजपच्या उपाध्यक्षा खा. प्रीतमताईंनी आघाडी सरकारच्या अपयशी कारभाराचे काढले वाभाडे  



जालना, दि. 30 (लोकाशा न्यूज) : राज्यात आघाडी सरकारला सत्तेवर येवून एक वर्ष पुर्ण झाले आहे. वर्षपुरतीत हे सरकार सर्वच ठिकाणी खर्‍या अर्थाने अपयशी ठरले आहे. या सरकारच्या अपयशी कारभाराचे भाजपच्या उपाध्यक्षा खा. प्रीतमताई मुंडे यांनी चांगलेच वाभाडे काढले आहेत.
जालन्यामध्ये पत्रकार परिषदेत खा. प्रीतमताई मुंडे यांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. ‘प्रत्येक जिल्ह्यातील रुग्णालयांमध्ये व्हेंटिलेटर हे केंद्राच्या पीएम निधीमधून आले आहेत, यात राज्याच्या कोणताही वाटा नाही. कोविड सेंटर उभारण्यात राज्य सरकारकडून अक्षम्य दिरंगाई झाली आहे’, या सरकारने भाजपच्या काळातील अनेक कल्याणकारी निर्णयांना स्थगिती दिली आहे. त्यामुळे हे महाविकास आघाडीचे बिघाडी आणि स्थगिती सरकार आहे’, राज्य सरकारने फक्त बदल्या आणि नवीन गाड्या घेण्याचा काम केलं आहे. आमच्या काळात सरकारने शेतकर्‍यांना अनेक माध्यमातून मदत दिली. मात्र, आताचे राज्य सरकार सर्व बाबतीत सपशेल अपयशी ठरले आहे. या सरकारला शेतकर्‍यांच्या प्रश्‍नांचा विसर पडला आहे, महिला, विद्यार्थी, तरुण, मजूर अशा कोणत्याही घटकाला या सरकारला न्याय देता आला नाही, राज्य सरकारची वर्षपूर्ती झाली असली तरी जनतेच्या निराशेची वर्षपूर्ती झाली आहे. त्यामुळे लवकरच सरकार जिथून आले तिथे परत जाणार आहे, असं भाकीतच यावेळी खा. प्रीतमताईंनी  वर्तवलं आहे. स्वसुरक्षेसाठी महिलांना हत्यारापेक्षा शालेय स्तरापासून स्वसंरक्षणाचे धडे दिले पाहिजे, अशी पंकजाताईंनी भूमिका मांडली होती. जर आमचे सरकार असते तर त्याची अंमलबजावणीही झाली असती, शेतकरी कायद्याबाबत लोकांची दिशाभूल करून केंद्र सरकरबाबत रोष निर्माण केला जात आहे. पत्रकार, कलाकार आणि जनतेचा आवाज दाबण्याचा प्रयत्न राज्य सरकारकडून केला जात आहे. त्यामुळे हे आघाडी सरकार  स्वतः अस्ताकडे चालले आहे, कोरोनाच्या संकटात या सरकारला ठोस असे काहीच करता आले नाही, अतिवृष्टीने उद्वस्त झालेल्या शेतकर्‍यांना पुरेशी मदतही या सरकारला देता आली नाही, केंद्र सरकारने मोफत अन्यधान्य वाटप, तसेच आरोग्य यंत्रणेला बळकटी देण्यासाठी व्हेंटीलेटर आणि सर्व सुविधा पुरविल्या, भाजप सरकारच्या कल्याणकारी योजना या राज्य सरकारने रद्द केला, स्वत:चे अपयश झाकण्यासाठीच राज्य सरकारकडून खटाटोप सुरू आहे, मात्र या खटाटोपीचा महाराष्ट्रातील जनतेवर काहीच परिणाम होणार नाही, कारण भाजपने तळागळातील लोकांच्या मनात स्वत:चे चांगले स्थान निर्माण केलेले आहे. त्यामुळे पावलोपावली जनता भाजपसोबतच राहील, असा विश्‍वासही यावेळी खा. प्रीतमताई व्यक्त केला आहे.
— 

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!