देश विदेश

काँग्रेस नेते डी.के. शिवकुमार यांच्या मुंबई, दिल्लीसह १४ मालमत्तांवर सीबीआयच्या धाडी


मुंबई, दि.5 (लोकाशा न्यूज) :
काँग्रेसचे कर्नाटकचे प्रदेशाध्यक्ष डी.के. शिवकुमार व त्यांचे बंधू डी.के. सुरेश यांच्या १५ पेक्षा अधिक मालमत्तांवर सीबीआयनं आज छापेमारी केली. शिवकुमार यांच्यावर करण्यात आलेल्या एका भ्रष्टाचार प्रकरणात सीबीआयकडून ही कारवाई करण्यात आली. शिवकुमार यांच्या कर्नाटकासह मुंबई, दिल्ली येथील मालमत्तांवर सीबीआयनं धाडी टाकल्या. यात बंगळुरू ग्रामीणचे खासदार डी.के. सुरेश यांच्या घरांचीही सीबीआयकडून झाडाझडती घेण्यात आली.
कर्नाटकचे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डी.के. शिवकुमार यांच्याविरुद्ध सीबीआयनं भ्रष्टाचाराचा गुन्हा दाखल केलेला आहे. बेहिशोबी मालमत्ता जमवल्याचा आरोप शिवकुमार यांच्यावर ठेवण्यात आलेल्या आहे. याप्रकरणी सीबीआयनं कर्नाटकातील नऊ, दिल्लीतील चार आणि मुंबईतील एक अशा शिवकुमार यांच्या १४ ठिकाणांवर आज धाडी टाकल्या. सूत्रांनी इंडियन एक्स्प्रेसला दिलेल्या माहितीनुसार सीबीआयच्या पथकांनी बंगळुरूतील सदाशिवनगरमधील डीके शिवकुमार यांच्या, तर खासदार डीके सुरेश यांच्या कनकपुरा आणि बंगळुरूमधील मालमत्तांवर छापे टाकले. सीबीआय पोलीस अधीक्षक थॉमस जॉस यांच्या नेतृत्वाखालील पथकांनी सकाळी सहा वाजता धाडी टाकत झाडाझडती सुरू केली. या कारवाईसंदर्भात सीबीआयनं रविवारी सायंकाळीच विशेष न्यायालयाकडून परवानगी मिळाली होती. सर्वच ठिकाणी सीबीआयची कारवाई सुरू असून, या कारवाईवर काँग्रेसनं टीका केली आहे.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!