शिरूर कासार दि. 21 (लोकाशा न्यूज) शिरूर तालुक्यातील पिंपळनेर फाटा येथे अवैधरित्या दगड वाहतूक करणारा ट्रक तहसीलदार श्रीराम बेंडे यांच्या पथकाने पकडला आहे. सदरील ट्रक पुढील कार्यवाहीसाठी शिरूर कासार पोलीस स्टेशनला जमा करण्यात आला आहे.
शिरूर तालुक्यातील पिंपळनेर फाटा येथे काल दि. 21 रोजी दुपारी तीन वाजता विना परवानगी अवैध दगड वाहतूक करणारा ट्रक क्र M H 12 fc 9666 हा पकडून पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला. त्याचेवर 379 कलमा नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहभाग तहसिलदार श्रीराम बेंडे, तलाठी नीलकंठ सानप, ड्रायव्हर अमोल रणखांब, अभिमन्यू गाडेकर, नेटके, बर्डे यांच्या पथकाने ही कार्यवाही केली.