CORONA

दिलासादायक; करोना रिकव्हरी रेटमध्ये भारत अव्वल

दिल्ली, दि. १९ (लोकाशा न्यूज) : सध्या जगभरात करोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. भारतातही दररोज मोठ्या प्रमाणात करोनाबाधितांची नोंद होत आहे. असं असलं तरी दुसरीकडे एक दिलासादायक बाबही समोर आली आहे. देशातील करोनाबाधित रुग्ण बरे होण्याचा दर वाढला आहे. भारतातील रुग्ण बरे होण्याचा दर हा आता अमेरिकेपेक्षाही अधिक झाला असून भारत पहिल्या क्रमांकावर पोहोचला आहे. आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार गेल्या चोवीस तासांमध्ये देशातील ९५ हजार ८८५ जण करोनामुक्त झाले आहे. तर दुसरीकडे ९३ हजार ३३७ करोनाबाधितांची नोंद झाली आहे. ही संख्या करोनामुक्त झालेल्या रुग्णांपेक्षा कमी आहे.
देशातील करोनाबाधितांच्या एकूण संख्येनं ५३ लाखांचा टप्पा पार केला आहे. तर यापैकी ४२ लाख रूग्ण करोनामुक्त झाले आहे. अमेरिकेपाठोपाठ करोनाचा सर्वाधिक फटका भारताला बसला आहे. जगभरातील एकूण करोनाबाधितांपैकी १७ टक्के रुग्ण हे भारतात आहे. आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार देशातील रुग्ण बरे होण्याचा दर म्हणजेच रिकव्हरी रेट हा ७९.२८ टक्क्यांवर पोहोचला आहे. आरोग्य मंत्रालयानं याचं श्रेय केंद्र सरकारला देत रणनीती, ठोस उपाययोजनांसाठी चाचण्या, सुरुवातीच्या टप्प्यात रुग्णांची ओळख, ट्रॅकिंग आणि देखरेखीसाठी उचललेली पावलं यामुळे हे शक्य झाल्याचं म्हटलं आहे.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!