आष्टी

ऊसतोड मजूरांची दरवाढ केल्याशिवाय मागे हटणार नाही – आ. सुरेश धस


आष्टी, दि. 16 : महाराष्ट्र शासन आणि साखर कारखानदार यांनी ऊसतोडणी मजुरांची दरवाढ जाहीर केल्याशिवाय मजुरांनी आणि मुकादम आणि मजूर कारखान्याकडे पाठवू नयेत मजुरांचे घामाचे,रक्ताचे शोषण करणारे कारखानदार करताहेत ऊसतोड कामगारांच्या सर्व पक्ष संघटनांनी संप पुकारला आहे सरकार दडपशाही करून संपत मोडीत काढण्याचा प्रयत्न करत आहेत मात्र ऊसतोड कामगारांच्या न्यायमागण्या मान्य झाल्याशिवाय मागे हटणार नाही. ऊसतोडणी वाहतुकीचे दर काढल्याशिवाय कारखाने सुरू होऊ देणार नाही कारखाना प्रशासनाने कितीही गुन्हे दाखल केले तरी आमचा संघर्ष सुरू राहणार आहे. अशी संतप्त प्रतिक्रिया आ. सुरेश धस यांनी व्यक्त केली. पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाल्यानंतर जामीन झाल्यावर ते बोलत होते.
महाराष्ट्रात ऊसतोड मजूरांचा संप सुरु असताना मालेगाव,नाशिक येथून काही ऊसतोड मजूरांना घेऊन जाणारे तीन ट्रक मिरजगाव जि.अहमदनगरच्या हद्दीत म्हाढा तालुका ,कर्जत तालुक्यातील अंबालिका या कारखान्यांवर हे मजूर चालले होते.हे समजताच स्व. गोपीनाथराव मुंडे ऊसतोडणी मजूर संघटनेचे आष्टी तालुका अध्यक्ष बाबासाहेब आंधळे यांच्या सह आ.धस समर्थकांनी त्यांना थांबवून आष्टी येथे घेऊन आल्यानंतर या वाहनांमधून जवळपास 400 ते 450 मजूर आपल्या लहान मुलांसहीत कुठलीही काळजी न घेता जात असल्याचे विदारक चिञ होते.या मजूरांची कसल्याही प्रकारची कोरोनाची टेस्ट करण्यात आलेली आहे.सध्या कुठलाच कारखाना सुरु नसतानाही ही मजूर वाहतूकीची घाई कशासाठी असे सांगत सरकार जो पर्यंत ऊसतोड मजूर आणि मुकादम यांच्या वाढीबाबत निर्णय घेत नाहीत तोपर्यंत ऊसतोड मजूर आम्ही जाऊ देणार नाहीत तसेच सध्या आमचा संप शांततेत सुरु असून अशा पद्धतीने कारखानदार वाहतूक करणार असतील तर आम्हाला आमचा संप अधिक आक्रमक करावा लागेत असा इशारा आ.सुरेश धस यांनी दिला, यावेळी पोलिस निरीक्षक बाळासाहेब बडे म्हणाले, की ऊस तोडणी कामगारांना कारखान्याकडे जाण्यासाठी आडकाव केल्याप्रकरणी आ. सुरेश धस आणि मुकादम बाबासाहेब आंधळे यांच्यावर भा.द.वि.341 आणि 34 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून जामिनावर सोडण्यात आले आहे. तर ऊस तोडणी मजुरांच्या जीवनमरणाचा प्रश्न असलेला संप मोडीत काढण्यासाठी स्व. गोपीनाथराव मुंडे यांचे प्रमाणेच शासनाविरुद्ध लढणार्‍या आमचे लढवय्ये नेते आ. सुरेश धस यांच्यावर गुन्हा दाखल करणार्‍या महाराष्ट्र सरकारचा निषेध करत आहोत, असे स्व.गोपीनाथराव मुंडे ऊसतोडणी कामगार संघटनेचे अध्यक्ष बाबासाहेब आंधळे यांनी म्हटले आहे.

एकाच वेळी निषेधही आणि आपुलकीही
आ.सुरेश धस यांच्यावर गुन्हा दाखल केल्याबद्दल समर्थक कार्यकर्ते आणि उसतोड मजूर कामगार संघटनांनी खडकत चौकांमध्ये सरकारचा तीव्र निषेध नोंदवला मात्र याचवेळी आ. सुरेश धस मित्र मंडळाच्या कार्यकर्त्यांनी सर्व साडेचारशे मजुरांना सकाळी चहापाणी नाष्टा व दुपाराचे जेवणाची सोय करताना दिसत होते. एकाच वेळी निषेध आणि मजुराविषयी ची आपुलकीही दिसून येत होती.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!