बीड आष्टी

आष्टी नगरपंचायत उर्वरित चार जागेसाठीची आरक्षण सोडत जाहीर

आष्टी:- आष्टी नगर पंचायत च्या 13 जागेसाठी 21 डिसेबर रोजी मतदान झाले आहे. चार प्रभाग ओबीसीसाठी राखीव असल्याने येथे निवडणुक झाली नाही. परंतु न्यायालयाने आदेश दिल्याने या चार जागेसाठी 28 जानेवारी रोजी मतदान होणार असल्याने या चार जागेचे आज आरक्षण जाहिर झाले आहे.
आष्टी नगरपंचायत मधिल प्रभाग क्रं. 3, प्रभाग क्रं. 4, प्रभाग क्र. 6, प्रभाग क्र. 11 हे चार प्रभाग ओबीसाठी राखीव होते. परंतु ओबीसी आरक्षण कोर्टात न टिकल्याने या चार जागेवरची निवडणूक रद्द करण्यात आली होती. आता या चार प्रभागातील चार जागेसाठी 18 जानेवरीला मतदान होणार आहे. त्यासाठी आरक्षण काढण्यात आले असुन प्रभाग क्रं.3 सर्वसाधारण, प्रभाग क्र.4 सर्वसाधारण महिला, प्रभाग क्रं.6 सर्वसाधारण महिला, प्रभाग क्रं.11 सर्वसाधारण असे नविन आरक्षण निघाले आहे.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!