देश विदेश

पंजाब नॅशनल बँकेत नोकरीची संधी, आजपासून भरती प्रक्रियेस प्रारंभ

नवी दिल्ली, दि.8 (लोकाशा न्युज) ः– सरकारी बँकांमध्ये स्पेशालिस्ट ऑफिसरच्या पदांच्या भरतीसाठी तयारी करत असलेल्या इच्छुकांसाठी नोकरीची सुवर्णसंधी चालून आली आहे. पंजाब नॅशनल बँकेनेविविध विभागांच्या एमएमजीएस-2 आणि एमएमजीएस-3 ग्रेड/स्केलवर मॅनेजर आणि सीनियर मॅनेजरच्या पदांसाठी भरती घोषित केली आहे. या भरतीसाठी जाहीरात प्रसिद्ध झाली असून भरतीसाठीचे नोटिफिकेशन सोमवारी पीएनबीनेपिलळपवळर.ळपया आपल्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध केले आहे. या भरतीप्रक्रियेसाठीची प्रक्रिया आज, 8 सप्टेंबरपासून सुरू झाली आहे.
पात्र आणि इच्छुक उमेदवार पीएनबीच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन करिअर विभागात उपलब्ध करून दिलेल्या ऑनलाइन फॉर्मच्या मदतीने आपला अर्ज दाखल करू शकतात. पीएनबीने ऑनलाइन अर्ज प्रक्रियेसाठी 29 सप्टेंबर 2020 ही तारीख निर्धारित केली आहे.
पंजाब नॅशनल बँकेनेमॅनेजर आणि सीनिअर मॅनेजरच्या पदांसाठी स्पेशालिस्ट ऑफिसरच्या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी इच्छुक उमेदवारांना बँकेच्या अधिकृत संकेतस्थळावर गेल्यानंतर करिअर विभागात जावे लागेल. तिथे ऑनलाइन अ‍ॅप्लिकेशन फॉर्म लिंकवर उपलब्ध करून देण्यात आला आहे. यावर क्लीक करून उमेदवार आयबीपीएसच्या अ‍ॅप्लिकेशन पोर्टलवर जातील. तिथे उमेदवारांना आधी रजिस्ट्रेशन करावे लागेल. त्यानंतर पासवर्डच्या मदतीने लॉगइन करून उमेदवार आपला अर्ज सबमिट करू शकतील.या भरतीप्रक्रियेसाठी एससी, एसटी आणि पीडब्ल्यूबीडी या वर्गातील उमेदवारांसाठी अर्ज शुल्क 175 रुपये आहे. तर खुल्या प्रवर्गासाठीचे शुल्क 800 रुपये आहे.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!