देश विदेश मनोरंजन

माशीला मारण्याच्या प्रयत्नात ‘या’ व्यक्तीने आपले घरच जाळले, प्रकरण काय आहे ते जाणून घ्या

कधीकधी अशी प्रकरणे समोर येतात ज्यावर विश्वास ठेवणे फार कठीण होते. अशीच एक घटना फ्रान्समध्ये समोर आली आहे जिथे एका माणसाने माशी मारण्याच्या प्रक्रियेत आपले घरच जाळले. हा माणूस माशीच्या गुणगुणण्याच्या आवाजाने इतका अस्वस्थ झाला होता आणि तिला मारण्यासाठी इलेक्ट्रॉनिक रॅकेटचा वापर करत होता.

AFP च्या म्हणण्यानुसार, फ्रान्समधील डोर्डनमध्ये राहणारे सुमारे 80 वर्षाचे वृद्ध रात्रीचे जेवण करीत होते, परंतु एका माशीच्या गुणगुणण्याच्या आवाजाने ते अस्वस्थ होऊ लागले. अशातच त्यांनी कीटकांना मारण्यासाठी वापरणारे इलेक्ट्रॉनिक रॅकेट उचलले आणि माशीला मारण्याचा प्रयत्न केला. पण त्यावेळी त्यांच्या घरात गॅस लीक होत होता आणि इलेक्ट्रॉनिक रॅकेटचा हवेतच स्फोट झाला. या स्फोटात त्यांचे किचन आणि घराच्या छताचे बरेच नुकसान झाले आहे. स्थानिक माध्यमांच्या म्हणण्यानुसार, ते नशिबवान आहेत की झालेल्या स्फोटातून वाचले, परंतु त्यांचा हात किंचितच जळाला आहे. ते सध्या एका छावणीत राहत आहे आणि त्याचे कुटुंब घर दुरुस्त करत आहे.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!