Uncategorized

कोरोनाच्या विरोधात रेखावारांची गस्त!!

जिल्हा शल्यचिकीत्सकांना सोबत घेवून जिल्हाधिकारी पोहचले तालुकास्तरावरबीड, धारुर : जिल्हावासियांच्या अडचणी सोडविण्यासाठी जिल्हाधिकारी राहूल रेखावार अत्यंत तत्पर असतात, कोरोनाला रोखण्यासाठी त्यांनी केलेली विशेष कामगिरी संपूर्ण जिल्ह्याने आपल्या डोळ्याने पाहिलेली आहे. मागच्या तीन-चार महिण्यात सातत्याने त्यांनी कोरोनाच्या विरोधात दोन हात केलेले आहेत. यामुळेच बरेच दिवस त्यांना कोरोनाला रोखण्यात खर्‍या अर्थाने यश आले होते, आता कोरोना जिल्ह्यात आला असला तरी त्याला हरवायचे कसे, कोरोनाचा प्रार्दुभाव वाढू नये, यासाठी प्रशासनाबरोबरच डॉक्टरांनी नेमकी कोणती आणि कशी खबरदारी घ्यायची, हे सांगण्यासाठीच जिल्हाधिकारी स्वत: तालुकास्तरावर जावून बैठका घेत आहेत. शुक्रवारी त्यांनी बीड, शिरूर, आष्टी आणि पाटोदा या तालुक्यातील तर शनिवारी धारूर, वडवणी, केज, अंबाजोगाई या तालुक्यातील प्रशासनासह खासगी रूग्णालयातील डॉक्टरांची बैठक घेतली, अडचणींवर तात्काळ मात करण्यासाठी त्यांनी यावेळी आपल्यासोबत जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. अशोक थोरात यांना घेतलेले आहे. वास्तविकत: त्यांचे हेच काम पाहून जिल्हावासियांमधून त्यांच्या कामाचे कौतूक केले जात आहे.
धारूर येथील पंचायत समिती सभागृहात शनिवार रोजी सकाळी 11 वाजता जिल्ह्याचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार,जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक थोरात यांच्या उपस्थितीत धारूर आणि वडवणी तालुक्याची आढावा बैठक घेण्यात आली.यावेळी विविध विषयावर मार्गदर्शक सूचना जिल्हाधिकारी यांनी उपस्थितांना केल्या.यामध्ये प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी डॉक्टर्स,पंडित-पुजारी,मौलवी आणि पत्रकार यांना केले. शनिवार रोजी येथील पंचायत समिती सभागृहात कोरोना-19 संदर्भात जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी आढावा बैठक घेतली.यावेळी तालुक्यातील खाजगी रुग्णालयाचे डॉक्टर उपस्थित होते.सर्व डॉक्टर यांना मार्गदर्शक सूचना करत त्यांच्या अडचणी समजून घेत डॉक्टरांच्या त्या अडचणी सोडवण्यासाठी जिल्हाधिकारी धारूर येथे आले होते.यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करत असताना जिल्हाधिकारी रेखावार यांनी नागरिकांना काही सूचना केल्या.यामध्ये प्रामुख्याने सर्वांनी मास्क लावणे बंधनकारक आहे तसेच मास्क न लावणार्‍यांवर दंडात्मक कारवाई केली जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.त्याच बरोबर कोवीड-19 ची लक्षणे दिसून येणार्‍या रुग्णास प्राथमिक तपासणी करताना त्याच्या मनातील भीती घालवण्यासाठी डॉक्टरांनी त्या रुग्णाचे समुपदेशन करणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त केले.यापुढे विशिष्ट वेळे मध्येच चाचणी न करता 24 तास सेंटर येथे चाचणी करण्यात येणार असल्याचेही जिल्हाधिकार्‍यांनी स्पष्ट केले.लक्षणे दिसून येतात त्या नागरिकांनी स्वतः पुढे येत तपासणी करून घ्यावी त्यामुळे भविष्यातील संभाव्य धोका कमी होतो.आणि आपल्यामुळे कुटुंबियांना त्रास होणार नाही याची शक्यता अधिक असते त्यामुळे लक्षणे दिसून येताच नागरिकांनी पुढे येत आपली तपासणी करून घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी यांनी यावेळी केले. सारी सदृश्य आजाराची लक्षणे आढळून आल्यास त्या रुग्णाची कोरोना तपासणी करण्यात यावी, जोपर्यंत त्याचा अहवाल येत नाही तोपर्यंत त्या व्यक्तीस सुरक्षितपणे त्याच्यावर डॉक्टरांनी विलाज करावा, कारण अहवाल येईपर्यंत ‘त्या’ व्यक्तीस नेमकी कोणती लक्षणे आहेत कोणता आजार आहे हे समजणार नाही. ती व्यक्ती जर कोरोना पॉझिटिव्ह आढळून आली तर तत्पूर्वीच त्याच्यावर सुरक्षितपणे उपचार केल्याने त्या व्यक्तीचा इतरांना संसर्ग वाढणार नाही, या बैठकीस जिल्हाधिकारी राहुल रेखावार,जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक थोरात, धारूरचे नगराध्यक्ष डॉ. स्वरूपसिंह हजारी, धारूरच्या तहसीलदार वंदना शिडोळकर, वडवणी येथील तहसीलदार, वैद्यकीय अधिकारी डॉ. चेतन आदमाने, सचिन शेकडे, धारूरचे गट विकास अधिकारी सोपान अकेले, पंचायत समिती सभापती यांचे पती हनुमंत नागरगोजे यांची उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पंचायत समिती कर्मचारी श्री.सोनवणे यांनी केले.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!