देश विदेश

सुशांत प्रकरणी मोठी कारवाई, शोविक चक्रवर्ती, सॅम्युअल मिरांडाला अटक होणार

अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यूचा तपास सीबीआयकडे सोपवल्यानंतर नवी माहिती समोर आली होती. दरम्यान, ड्रग्स कनेक्शनशी निगडीत एनसीबीद्वारे मोठी कारवाई केली सुरू आहे. एनसीबीनं रिया चक्रवर्तीचा भाऊ शोविक चक्रवर्ती याच्यासह सॅम्युअल मिरांडाच्याही अटकेची तयारी केली आहे. यापूर्वी एनसीबी आज कोणतीही अटक होणार नसल्याचं सांगितलं होतं. परंतु एनसीबीच्या चौकशीनंतर त्यांना काही कायदेशीर बाबींची पूर्तता करून अटक करण्यात येणार आहे. शुक्रवारी सकाळी सॅम्युअल मिरांडाच्या घरावर एनसीबीनं छापा टाकला होता आणि चौकशीसाठी शोविकलाही सोबत नेलं होतं. शोविकला लवकरच अटक होऊ शकते असं असं एनसीबीचे उप-महासंचालक केपीएस मल्होत्रा यांनी सांगितलं होतं. सकाळपासूनच शोविकच्या डोक्यावर अटकेची टांगती तलवार होती. रियाच्या घरावर छापा टाकल्यानंतर नारकोटिक्स कंट्रोल ब्यूरोची टीम शौविक चक्रवर्तीला सोबत घेऊन गेली होती. शोविकची ड्रग पेडलरसोबत चौकशी करण्यात आली होती.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!