वडवणी

बसच्या धडकेत दुचाकीवरील दोन तरूण जागीच ठार


वडवणी : हिवरगव्हण येथे मित्राला मोटरसायकलवर सोडून आपल्या उपळी गावाकडे येत असताना बाबी फाट्याजवळील गतिरोधकवर पाठीमागून येणार्‍या एसटीबसने जोराची धडक देत मोटरसायकल स्वरांना उडवले अपघात एवढा भीषण होता की दोन्ही तरुण जागीच ठार झाले असल्याची घटना आज दिनांक 3 सप्टेंबर रोजी रात्री साडेनऊच्या दरम्यान वडवणी तालुक्यातील बाबी फाट्याजवळ घडली असल्याची ची माहिती पोलिस सूत्रांनी दिली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की,

वडवणी तालुक्यातील उपळी येथील तरुण ऋषिकेश राजु शेळके वय 23 वर्षे,ओमप्रकाश श्रीमंत राऊत वय अंदाजे 26 वर्ष हे आपल्या मोटरसायकलवर हिवरगव्हाण येथील मित्राला सोडुन आपल्या गावी उपळीला येत असताना बाबी फाट्या जवळ असणार्‍या गतिरोधक जवळ पाठीमागून बीड वरून येणार्‍या परभणी आगाराची एसटी बस एम एच 20 बी एल 36 12 क्रमांकांच्या एस टी बस चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने विना नंबर असलेल्या मोटरसायकल पाठीमागून जोराची धडक दिली यामध्ये ऋषिकेश शेळके व ओमप्रकाश राऊत या दोन्ही तरुणाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना आज दिनांक 3 सप्टेंबर रोजी रात्री साडेनऊच्या दरम्यान घडली आहे जखमी अवस्थेत तरुणांना उपचारासाठी बीड जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले आहे. या घटनेची माहिती वडवणी पोलिसांना कळतात उपळी बीट अंमलदार नवनाथ ढाकणे यांनी या घटनेकडे तात्काळ धाव घेतली होती. सदरील या घटनेने उपळी गावात शोककळा पसरली आहे मात्र ही घटना वृत्तसंकलन करेपर्यंत वडवणी पोलीस मध्ये कुठल्या प्रकारचा गुन्हा नोंद झाला नव्हता या घटनेचा अधिक तपास वडवणी पोलीस करत आहेत.
error: Content is protected !!