वडवणी

पोहायला गेलेल्या दोन मुलांचा आडातील पाण्यात बुडून मृत्यू

बाहेगव्हाण येथील दुर्दैवी घटनावडवणी : वडवणी तालुक्यातील बाहेगव्हण येथील गावात जवळील सार्वजनिक आडात पोहण्यासाठी गेलेल्या दोन्ही 10 वर्षीय मुलांचा सार्वजनिक आडामध्ये बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना आज दुपारी एक वाजता बाहेगव्हण येथे घडली. सदरील मुलांचा मृतदेह बाहेर काढुन उपचारासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून शाळकरी मुलांना मृत घोषित केले .
याबाबत अधिक माहिती अशी की, बाहेगव्हाण येथील येथील दुपारी एक वाजता लखन महादेव पोटभरे वय 10 वर्षे व रोहन रामेश्वर मस्के वय 10 वर्षे हे दुपारी गावाच्या अगदी जवळ असणार्‍या सार्वजनिक आडामध्ये पोहोण्यासाठी गेले असता त्यातील रोहन रामेश्वर मस्के यांनी पाहण्याकरता आडामध्ये उडी मारली पण त्याला पोहता येत नव्हते पाण्यात बुडू लागला जवळच आडाच्या काटावर बसलेला लखन महादेव पोटभरे या मुलांनी त्याला वाचण्यासाठी उडी मारली त्याला वाचवण्याच्या नादात दोघेही पाण्यात बुडाले त्यातच त्यांचा मृत्यू झाला आडाजवळ दुसरे काही मुले जवळ बंधार्‍यात पोहोत होते. त्यांच्या ही गोष्ट लक्षात आल्यानंतर त्यांनी त्यांच्या घरी जाऊन या घटनेची माहिती दिली मग एकच आरडाओरडा झाल्यामुळे लोक आडाजवळ जमा झाले उड्या मारून त्यांचे मृतदेह बाहेर काढले व त्यांना तातडीने वडवणी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले येथील डॉक्टरांनी तपासणी केली असता मृत घोषित करून शवविच्छेदन करण्यात आले असून बाहेगव्हण येथे शोकाकुल वातावरणात अंत्यविधी करण्यात आला या दुर्दैवी घटनेने बाहेगव्हण येथे हळहळ व्यक्त केली जात आहे.

error: Content is protected !!