बीड वडवणी

द्रोपदी गंपू पवार यांचे निधन

वडवणी, दि.6 (लोकाशा न्युज)ः- वडवणीचे माजी सरपंच गंपु पवार यांच्या पत्नी द्रोपदी गंपू पवार (वय -55 वर्षे यांचे पुणे येथील एका खाजगी रुग्णालयात गुरूवार दि.6 जानेवारी रोजी दिर्घ आजाराचे उपचार घेतांना निधन झाले.
उमेदीच्या काळात अकाली मृत्यु येणे ही फार दुःखदायक व मनाला चटका लावून जाणारी अशी घटना आहे. नियतीने आणि शरिराने दगा दिल्याने दीर्घ आजार जडले. आजाराशी झुंज चालू असतांना गुरूवारी दि.06 जानेवारी रोजी   पुणे येथील राम मंगल हॉस्पीटलमध्ये उपचार दरम्यान प्राणज्योत मावळली. त्यांच्या पश्‍चात संजय गंपू पवार, संतोष गंपू पवार, शाम गंपू पवार, मुलगी अशा गंपू पवार असा परिवार असून मनमिळाऊ स्वभावाच्याय माऊली हरविल्याने पवार कुटूंबियांवर दुःखाचे डोंगर कोसळले आहे. शुक्रवार दि.7 जानेवारी रोजी  धैस तांडा वडवणी येथे सकाळी 9 वाजता अत्यंविधी होणार असून त्यांच्या दुःखात दैनिक लोकाशा परिवार सहभागी आहे.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!