वडवणी बीड

27 वर्षीय युवकाची गळफास घेऊन आत्महत्या


वडवणी, दि. २९ (लोकाशा न्यूज) :
वडवणी तालुकयातील खळवट लिंबगाव येथे एका 27 वर्षीय युवकानी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी दि.29 सप्टेंबर रोजी घडली. संभाजी आर्जुन डांबे असे त्याचे नाव आहे.
वडवणी तालुक्यातील मुळचे बाहेगव्हाण येथील रहिवासी असणारे आर्जुनराव डांबे यांची खळवट लिंमगाव येथे शेती असल्याने ते खळवट लिंमगाव येथेच आपल्या कुटुंबासह राहात होते. त्यांचा मुलगा संभाजी आर्जुन डांबे वय 27 वर्षे या तरुणाने स्वत:च्या घरात फॅनला दोरीच्या सहाय्याने गळफास घेउन आत्महत्या केल्याची घटना दि.29 सप्टेंबर मंगळवार रोजी सकाळी11.00 वाजण्याच्या सुमारास घडली आहे. संभाजी डांबे या तरूणाने आत्महत्या कोणत्या कारणामुळे केली याचे कारण समजू शकले नाही. या प्रकरणी वडवणी पोलीस स्टेशनला आकस्मित म्रुत्युची नोंद झाली आहे.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!