देश विदेश

विराट कोहली होणार बाबा; इंस्टाग्रामवरुन केली घोषणा

दिल्ली, दि.27 (लोकाशा न्यूज) : भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली लवकरच बाबा होणार आहे. याची घोषणा विराट कोहलीने आपल्या सोशल मीडियावरुन केली आहे. बॉलीवूडची दिग्गज अभिनेत्री अनुष्का शर्माबरोबरचा फोटो शेअर करत विराटने हे सांगितले आहे.
“मग आम्ही तिघे होणार. जानेवारी २०२१,” असे विराटने आपल्या ट्विटमध्ये लिहीले आहे. १० डिसेंबर २०१७ रोजी भारताच्या या कर्णधाराने बॉलीवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्री अनुष्का शर्माशी लग्न केले होते. त्यानंतर सोशल मीडियावर विराटला सतत बाबा कधी होणार हा प्रश्न विचारला जात होता. अखेर विराटनेच याची घोषणा आज केली. सध्या विराट दुबईमध्ये असून आयपीएलच्या १३व्या हंगामासाठी तयार होत आहे. विराटने आयपीएलचे १२ हंगाम बेंगलोर संघाकडून खेळले आहेत. बहुतांश क्रिकेटर संघासोबत दुबईला गेले असताना विराट एकटाच का गेला होता याचे अखेर उत्तर चाहत्यांना मिळाले आहे.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!