आष्टी

कार अपघातात वैद्यकीय अधिकार्‍याचा मृत्यू

नगर-बीड रोडवरील खड्ड्यांचा बळीकडा,
टाकळसिंग प्राथमिक आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. वैभव क्षीरसागर यांच्या कारला नगर-बीड रोडवरील दशमीगव्हाण परिसरात रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे गुरुवारी अपघात झाला होता. या अपघातात डॉक्टर गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर पुण्यातील रुग्णालयात उपचार सूरु असतानाच मंगळवारी त्यांचा मृत्यू झाला.
आष्टीकडून नगरकडे खाजगी कामानिमित्त जात असताना टाकळसिंग प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. वैभव क्षीरसागर यांच्या कारला दि. 20 ऑगष्ट रोजी दशमीगव्हाण परिसरात सकाळच्या सुमारास समोरुन भरधाव येणा-या अज्ञात वाहनाने हुलकावणी दिली. त्यामुळे कार रस्त्यावरच्या खड्ड्यात आदळल्यामुळे भीषण अपघात झाला होता. या अपघातात त्यांच्या डोक्याला व छातीला गंभीर दुखापत झाल्यामुळे त्यांना प्रथम नगरच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतू अचानक त्यांची प्रकृती बिघाडल्याने पुणे येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. मात्र मंगळवारी सायंकाळी उपचारा दरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. डॉ. वैभव क्षीरसागर टाकळसिंग परिसरातील गोरगरीब रुग्णांसाठी अक्षरश: देवदूत म्हणूनच परिचित होते. त्यांच्यावर गावी पारगाव येथे आज शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!