परळी.दि.१९—-बीड जिल्ह्याच्या खासदार डॉ.प्रितमताई मुंडे यांनी काल जिल्ह्यात येताच परळी शहरातील कोविड केअर सेंटर व अँटीजन टेस्ट केंद्रांना भेटी देऊन स्थानिक नागरिक,व्यापारी व कोविड योद्धयांशी संवाद साधल्या नंतर आजही त्यांनी परळी शहरातील अँटीजन टेस्ट केंद्रांना भेटी देऊन टेस्ट करण्यासाठी आलेल्या नागरिक व व्यापाऱ्यांना अल्पोपहार व पाणी बॉटल्स वाटप करून परळीकरांना मदत केली आहे.
परळी शहरातील नटराज रंग मंदिर,पंचायत समिती, सरस्वती विद्यालय व बस स्थानक येथील अँटीजन टेस्ट केंद्रांना खा.मुंडे यांनी भेटी दिल्या.आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांकडून अँटीजन टेस्टची माहिती त्यांनी घेतली व नागरीकांच्या आरोग्याच्या दृष्टीने सूचना केल्या.काल परळीतील अँटीजन टेस्ट केंद्रांना भेटी दिल्या नंतर शहरातील नागरिक व व्यापाऱ्यांनी खा.प्रितमताई मुंडे यांना होणाऱ्या गैरसोयी बद्दल माहिती दिली होती.सर्वसामान्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी नेहमीच तत्पर असलेल्या खा.प्रितमताईंनी परळीकरांच्या गैरसोयीची दखल घेऊन आज अँटीजन टेस्ट केंद्रांवर अल्पोपहार व पाण्याची सुविधा उपलब्ध करून दिली.याप्रसंगी त्यांनी नागरिकांशी संवाद साधताना परळीला कोरोना मुक्त करण्याचे ध्येय साध्य करण्यासाठी भीती न बाळगता अँटीजन टेस्ट करण्याचे आवाहन करत व्यापारी नागरिकांचा अँटीजन टेस्ट अहवाल निगेटिव्ह यावा व परळीकरांना उत्तम आरोग्य लाभावे अशी सदिच्छा व्यक्त केली.तसेच परळीकरांना कोरोनाच्या संकटातून बाहेर काढण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणाऱ्या कोरोना योद्धयांशी चर्चा करताना भविष्यात “पिढी वाचवणारे” योद्धे असा तुमचा गौरव होईल हा विश्वास व्यक्त केला. तसेच त्यांनी पंचायत समितीच्या केंद्रावर भेट देऊन अंगणवाडी सेविकांशी देखील संवाद साधला.अँटीजन टेस्ट केंद्रावर अन्न पाण्याशिवाय तासंतास उभ्या राहणाऱ्या परळीकरांनी खा.प्रितमताई मुंडे यांच्या तत्परतेचे तोंड भरून कौतुक करताना त्यांनी केलेल्या मदतीसाठी समाधान व्यक्त केले.