मुंबई

सहकारी बँकांबाबत चिंता; शरद पवारांचे पंतप्रधान मोदींना पत्र

मुंबई, दि.19 (लोकाशा न्युज) राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून सहकारी बँकांना वाचवण्याची विनंती केली आहे. सहकारी बँका ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा आहेत, या वक्तव्याशी पंतप्रधान नरेंद्र मोदी हेदेखील सहमत असतील असं ते म्हणाले. तसंच सहकारी बँकांनी देशात साक्षरता वाढवण्याची महत्त्वाची भूमिकाही साकारली असल्याचं त्यांनी पत्रात नमूद केलं आहे. शरद पवार यांनी आपल्या पत्रात सहकारी बँकांमध्ये सरकारच्या वाढत असलेल्या हस्तक्षेपाबद्दल चिंता व्यक्त केली. “सहकारी बँकांचं सहकारपण कायम ठेवलं पाहिजे. असं झालं तरच या बँका शेतकरी आणि ग्रामीण मजूर तसंच शेतीच्या कामासाठी मदत करण्याच्या आपल्या हेतूमध्ये यशस्वी होतील,” असं शरद पवार यांनी पत्रात नमूद केलं आहे.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!