अंबाजोगाई

अंबाजोगाई 3.30 वाजेपर्यंत 24 पॉझिटीव्ह

अंबाजोगाई ,दि.18(लोकाशंा न्यूज): शहरातील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राबविण्यात येत आलेल्या अँटिजन टेस्टचा antigen test प्रारंभ सकाळी आठ वाजता झाला. 3.30 वाजेपर्यंत व्यापार्‍यांसह विक्रेते असे एकूण 24 जण कोरोना पॉझिटिव्ह corona positive आले आहेत. तालुका आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे. रोटरी क्लब ऑफ अंबाजोगाई सिटी, rotory club of ambajogai city भारतीय जैन संघटना, नगर परिषद व महाराष्ट्र शासन आरोग्य विभाग यांच्यावतीने खोलेश्वर विद्यालय, वेणूताई चव्हाण कन्या विद्यालय, जिल्हा परिषद शाळा, शिवाजी चौक. योगेश्वरी शाळा मंदिर विभाग या ठिकाणी अँटिजन टेस्ट करण्यात येत आहेत. शहरातील 5 बुथवर दुपारी 3.30 पर्यंत 900 जणांच्या चाचण्या पैकी 24 जण पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये जि.प. शाळा शिवाजी चौक 12, योगेश्‍वरी मंदिर यो.वि.6, प्रशांत नगर यो.वि.4 खोलेश्‍वर विद्यालय 1, वेणूताई चव्हाण विद्यालय 1 असे एकूण 24 पॉझिटिव्ह आले आहेत.  

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!