बीड

मोठा दिलासा; आज करोना मुक्त रुग्णांचा द्विशतक

202 रुग्ण बरे होऊन जाणार घरी

बीड, दि.17 :- जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या 2574 वर गेली आहे, कोरोनाची संख्या वाढली असली तरी यातून बरे होण्यार्‍या रूग्णांची संख्याही मोठी आहे. आज कोरोनामुक्तचा आकडा द्विशतक पार केले आहे. जिल्ह्यातील तब्बल 202 रूग्ण आज कोरोनामुक्त होणार आहेत. यामध्ये बीड 103, आष्टी 10, पाटोदा 2, गेवराई 6, माजलगाव 19, वडवणी 5, धारूर 2, केज 13, अंबाजोगाई 10, परळी तालुक्यातील 32 असे एकूण 202 जणांना आज सुट्टी देण्यात आली आहे. 1190 रूग्णांवर उपचार सुरू असून आतापर्यंत 1318 बरे झालेले आहेत. तर 66 जणांचा मृत्यू झालेला आहे, कोरोनाला रोखण्यासाठी जिल्हाधिकारी राहूल रेखावार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार, एसपी हर्ष पोद्दार, जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. अशोक थोरात, जिल्हा आरोग्य अधिकारी राधाकिसन पवार यांच्यासह त्यांची संपूर्ण टिम आपला जीव धोक्यात घालून काम करत आहे, त्यामुळे या सर्व कोरोना योध्द्यांना जिल्ह्यातील नागरिकांनी पुर्णपणे सहकार्य करणे आवश्यक आहे. नागरिकांनी काळजी घेतल्यास कोरोनाला सहजणपणे हरविता येणार आहे.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!