माजलगाव : लोकाशा न्युज
माजलगाव मतदार संघातील माजलगाव धारूर वडवणी या तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर विकास कामांसाठी शेकडो कोटींचा निधी मागील एक महिन्यापासून मुंबई येथे तळ ठोकून खेचून आणल्याची माहिती आमदार प्रकाश सोळंके शनिवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली
माजलगाव महाविद्यालयाच्या कॉन्फरन्स हॉलमध्ये पार पडलेल्या या पत्रकार परिषदेत पुढे बोलताना त्यांनी सांगितले की एमआयडीसीत 17 कोटी रुपयांची पाणीपुरवठा योजना. क्रीडा संकुलासाठी 5 कोटी. केशवराज मंदिराच्या पुनर्बांधणी साठी 9 कोटी 45 लाख.मनुर गोविंदपुर,मोठेवाडी, खाडेवाडी, शिंदेवाडी, चोपनवाडी या रस्त्यांसाठी मुख्यमंत्री सडक योजनेत 27 कोटी 80 लाख.तर वसंतराव नाईक तांडा सुधार योजनेअंतर्गत दोन कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे बंद पडलेल्या उपसा जलसिंचन योजना पुन्हा सुरु करण्यात आले असून त्यासाठी अडीचशे कोटी रुपयांचा निधी यावर खर्च झाला असुन या योजनेचे 95 टक्के काम पूर्ण झालेले आहे. उपजिल्हा रुग्णालयाचे काम प्रगतीपथावर असून उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांच्या निवास स्थानासाठी 30 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. माजलगाव नगरपरिषदेला देखील दहा कोटी रुपयांचा निधी जिल्हा नियोजन मधून मिळाला असल्याचे सांगून शहरात चालू असलेल्या कामांबाबत होत असलेल्या विविध तक्रारी माझ्याकडे करा मी या संदर्भात संबंधितांना जाब विचारेल असेही ते यावेळी म्हणाले , तसेच शहरात सुरू असलेल्या विविध विकास कामांची देखील त्यांनी यावेळी माहिती दिली.
दरम्यान आगामी लोकसभा निवडणुकीबाबत पत्रकारांनी प्रश्न विचारले असता भारतीय जनता पार्टीने पंकजा मुंडे यांना बीड लोकसभेची उमेदवारी जाहीर केली असून त्यांना विक्रमी मतांनी निवडून आणण्यासाठी सज्ज असल्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली. या पत्रकार परिषदेला शिवसेनेचे तालुका अध्यक्ष तुकाराम येवले, सभापती जयदत्त नरवडे, माजी समाज कल्याण सभापती कल्याण आबूज, अच्युत लाटे यांची उपस्थिती होती.