बीड

राम भक्तांचा पाचशे वर्षाचा वनवास संपला – खा. डॉ. प्रितमताई मुंडे, तमाम हिंदू बांधवांची भावना नरेंद्र मोदिजींनी पूर्ण केली – राजेंद्र मस्के

( बीड प्रतिनिधी )

अयोध्या राम  मंदिराचा पाचशे वर्षाचा लढा आज संपुष्टात आला. तत्कालीन राजकीय प्रवाहाच्या विरोधार जाऊन लाखो कारसेवकांनी महान योगदान दिले. या योगदानाचे सार्थक झाले. स्व. गोपीनाथराव मुंडे, प्रमोदजी महाजन या लढ्यात सहभागी होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या परीस स्पर्शाने अनेक विषयांचे सोने झाले. देशाच्या प्रत्येक माणसांच्या मनामनात प्रभू राम चंद्र अवतरले सर्वत्र उत्साह आणि आल्हाददायक वातावरण असून,  आजचा हा अभूतपूर्व ऐतिहासिक सोहळा अखंड देशासाठी अविस्मरणीय आहे. खर्या अर्थाने राम भक्तांचा पाचशे वर्षाचा वनवास आज संपला. असे विचार जिल्ह्याच्या खा. डॉ. प्रितमताई मुंडे यांनी बीड भाजपा तर्फे आयोजित राम उत्सव दरम्यान उपस्थित रामभक्तांना संबोधित करताना मांडले.

छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल येथे भाजपा जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांच्या संकल्पनेतून राम उत्सव साजरा करण्यात आला. या उत्सवासाठी आचार्य अमृतआश्रम स्वामी महाराज, भाजपा अध्यात्मिक आघाडीचे महेंद्र महाराज मस्के, डॉ. सुभाष जोशी, अॅड.सर्जेराव तांदळे, कारसेवक विजयकुमार पालसिंगनकर, प्रा. देविदास नागगोजे, अशोक लोढा, नवनाथ शिराळे, सौ. जयश्रीताई मस्के, कल्याण तिडके, विक्रांत हजारी, डॉ. लक्ष्मण जाधव, शांतीनाथ डोरले, बालाजी पवार, सोमनाथराव माने, सुनील मिसाळ, संतोष राख, कपिल सौदा, राजू शहाणे,अमोल वडतिले, संगीता धसे, संध्या राजपूत, शैलजा मुसळे प्रीत कुकडेजा आदि पदाधिकारी व राम भक्त बहु संखेने उपस्थित होते. या राम उत्सवाचे सूत्र संचालान मारुती तीपाले यांनी केले.

यावेळी अयोध्येतील राममूर्ती प्राण प्रतिष्ठा सोहळ्यानंतर खा. प्रितमताई मुंडे व मान्यवरांच्या हस्ते प्रभू श्रीरामाची महाआरती करण्यात आली. जिल्ह्यातील प्रसिध्द गायक भरत अन्ना लोळगे सुश्राव्य राम भजनाचा रामभक्तांनी लाभ घेतला. लोक कलावंत कैलास काटे यांच्या पुढाकारातून अनेक लोक कलाकार या उत्सवात सहभागी झाले होते.

एक लाख पणतीतून प्रभू श्रीरामाची प्रतिकृती साकारणारे चित्रकार उद्देश पघळ, त्यांचे सहकारी मानव दुनगुले, सागर माने, राज करांडे, वैभव फरताडे, रोहित माने, योगेश चव्हाण, योगेश घोलप यांच्या सत्कार खा. प्रितमताई मुंडे यांच्या हस्ते करून, कौतुक करण्यात आले.    

प्रस्तावित करताना जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के म्हणाले की, देशभर राममय वातावरण असून सर्वत्र आनंदोत्सव साजरा केला जात आहे. भारतीयांची अस्मिता, प्रभू राम चंद्राचे भव्य मंदिर अयोध्येत जन्मस्थळी उभारले जावे यासाठी  मोठा संघर्ष या देशात झाला. अनेकांना बलिदान द्यावे लागले. मोदी सरकारने तमाम हिंदू बांधवांची भावना जपली. भारतीयांचे हे स्वप्न साकार करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रचंड मेहनत घेऊन आज हे स्वप्न साकार केले. आज हा राम उत्सव साजरा करण्याची संधी आमच्या पिढीला मिळाली याचा आम्हाला अभिमान वाटतो असे गौरोद्गार त्यांनी व्यक्त केले.

अध्यात्मिक क्षेत्रातील विद्यावान जिल्ह्याचे भूमिपुत्र महामंडलेश्वर आचार्य अमृतआश्रम स्वामी महाराज यांची या उत्सवात विशेष उपस्थिती होती. या मंगलमय सोहळ्यात रामभक्तांना त्यांनी मार्गदर्शन केले. येणाऱ्या काळात ज्यांच्या मनात हिंदू धर्माबद्दल ओलावा असेल त्यांच्या बरोबर चालावे लागेल. देव, देश, धर्म आणि परमात्मा यांच्या विषयी जे संशय घेतात त्यांना मुहतोड जबाब देऊन सनातन हिंदू धर्माचे रक्षण समस्थ हिंदू धर्मियांनी करावे असे आवाहन त्यांनी केले.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!