बीड

ज्ञानराधा मल्टीस्टेटच्या शाखा पुन्हा सुरू झाल्या, ग्राहकांनी केलेल्या सहकार्याबद्दल सुरेश कुटे अन् अर्चना कुटेंनी मानले आभार


बीड, दि. 20 (लोकाशा न्यूज) : एका बाजूने होणारी अफवा आणि दुसर्‍या बाजूने होणार्‍या गर्दीमुळे शहरातील ज्ञानराधा मल्टीस्टेटच्या शाखा गुरूवारी बंद होत्या, शुक्रवारी पुन्हा ज्ञानराधाच्या शाखा सुरू करण्यात आल्या आहेत. यावेळी ग्राहकांनी गर्दी न करता आपले व्यवहार केले, याबद्दल चेअरमन सुरेश कुटे आणि अर्चना कुटे यांनी ग्राहकांचे आभार मानले आहेत.
ज्ञानराधा मल्टीस्टेट विषयी झालेल्या अफवेमुळे गुरूवारी शाखा बंद राहिल्या, यावेळी वेगवेगळ्या आफवा सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रसारित होत होत्या, मात्र ग्राहक, ठेवीदार आणि व्यापार्‍यांच्या व सुरेश कुटे यांच्यावर प्रेम करणार्‍या व्यक्तींनी त्यांना आग्रह करून शुक्रवारी बीड शहरातील सर्व शाखा सुरळीत चालू करण्याचा आग्रह धरला, यावेळी ग्राहकांनी कर्मचार्‍यांना केलेला सपोर्ट, दिलासा देण्याचे काम केले, त्यामुळे चेअरमन सुरेश कुटे यांनी ज्ञानराधा मल्टीस्टेटची केज शाखा, शिरूर कासार शाखा, अंमळनेर शाखा, नेकनूर शाखा तसेच बीड मधील सारडा संकुल शाखा, मोंढा शाखा, जालना रोड शाखा, शिवाजी नगर शाखा, धानोरा रोड शाखा, अंबिका चौक शाखा सुरू केल्या. या सर्व शाखेस ग्राहकांनी गर्दी न करता ज्ञानराधा मल्टीस्टेट बँकेला विश्वासाची पोहोचपावती दिली, त्याबद्द्ल सर्व ग्राहकांचे आणि सर्व बीडकरांचे कुटेंनी मनापासून आभार मानले आहेत. सर्व ग्राहक व व्यापारी यांच्या सहकार्याने शाखा उघड्या  करून या ठिकाणी या बँकेतील दैनंदिन व्यवहार सुरळीत करण्यास सुरुवात झाली आहे. यावेळी शाखा उघडता वेळेस सर्व व्यापारी, ग्राहक व ठेवीदार उपस्थित होते. यावेळी त्यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या. यावेळी विट्टल गुजर,आबा खाडे,राम सावंत नितीन क्षीरसागर,ढाकणे सर्,राजेश डवरे कर्मचारी महादेव दाभाडे साहेब, फुळझलके साहेब, आजिणाथ आखाडे, दामकर साहेब, सिध्देश्वर, माने साहेब, नेहाल ,रोहन शिंदे, राहुल कारंडे आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान तुमचे असेच सहकार्य राहू द्या, तुमचा एकही रूपया बुडणार नाही, आणि सर्व शाखा नेहमीच प्रमाणेच सुरळीत चालतील असेही कुटे यांनी म्हटले आहे.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!