बीड

एसपींच्या पथकाचा वाळू माफियांना दणका, दोन कोटींचा मुद्देमाल जप्त


बीड-पोलीस अधिक्षक पथक प्रमुख असलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश मुंडे यांनी वाळू माफीयांना जोराचा दणका दिल्याचे बुधवारच्या कारवाईतून समोर आले आहे.राक्षसभुवन येथील गोदापात्रात केलेल्या कारवाईत दीड ते दोन हजार ब्रास वाळूचा साठा जप्त करण्यात आल्याची माहिती आहे.दरम्यान या कारवाईने जिल्ह्यातील वाळूमाफियामध्ये एकच खळबळ उडाली.

     पोलीस अधीक्षक पथकाचे प्रमुख म्हणून गणेश मुंडे यांनी जबाबदारी स्वीकारल्यानंतर जिल्ह्यात अनेक मोठया कारवाया केल्या आहेत. काही दिवसापूर्वी त्यांनी गंगापात्रता कारवाई करून 300 ब्रास वाळूसह टॅक्टर,केन्या असा कोटी दीड कोटींचा मुद्देमाल जप्त केला होता. आता त्यानंतर पुन्हा एकदा गणेश मुंडे यांनी वाळू माफियाना लक्ष करत राक्षसभुवन येथील गोदापात्रात छापा मारला. या कारवाईत तब्बल दीड ते दोन हजार वाळूसाठा पोलिसांनी ताब्यात घेतला असून सहा टॅक्टर, एक हायवा व एक आरोपी यांचा समावेश आहे. दरम्यान या कारवाईत दोन कोटीपेक्षा अधिक मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती देण्यात आली असून आजपर्यंतची गोदापात्रातील ही सर्वात मोठी कारवाई मानली जात आहे. 

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!