बीड

पंकजाताई मुंडे यांनी घेतले पुण्यातील मानाच्या पांच गणपतीसह विविध गणेशांचे दर्शन, ठीक ठिकाणी केली आरती ; गणेश मंडळाच्या वतीने झाले जंगी स्वागत

पुणे ।दिनांक २५।
भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी आज शहरातील मानाच्या पांच गणपतीसह विविध गणेशांचे दर्शन घेतले. ठिक ठिकाणी त्यांच्या हस्ते श्रींची आरती करण्यात आली. गणेश मंडळाच्या वतीने यावेळी त्यांचं जंगी स्वागत करण्यात आलं.

पुण्यातील गणेशोत्सव केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर जगभरात लोकप्रिय आहे. गणेशाच्या भव्य दिव्य मुर्तींचे तसेच देखाव्यांचे याठिकाणी आकर्षण असते. दरवर्षीच्या प्रथेप्रमाणे पंकजाताई मुंडे यांनी आजच्या पुणे दौ-यात सायंकाळी मानाच्या पांच गणपतीपैकी पहिल्या कसबा पेठेतील गणपतीचे दर्शन घेऊन आरती केली. त्यानंतर तांबडी जोगेश्वरी, गुरूजी तालीम मंडळ, तुळशीबाग, मंडई, दगडूसेठ हलवाई, एकलव्य होस्टेल, साने गुरूजी तरूण मंडळ, साई मित्र मंडळ आदी गणेश मंडळांना भेटी देवून श्रींची आरती केली. तत्पूर्वी दुपारी जंगली महाराज रस्त्यावरील अतिथी मुलींचे वस्तीगृह येथे गणेशाची आरती त्यांच्या हस्ते झाली. आ. माधुरीताई मिसाळ, दत्तात्रय खाडे, मुरलीधर मोहोळ, सदाशिव खाडे, धिरज घाटे, अशोक मुंडे व कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शहरात आगमन होताच पंकजाताई मुंडे यांचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी ठिक ठिकाणी जोरदार स्वागत केले.
••••

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!