बीड

जनतेच्या आशीर्वादाने विकासाची प्रक्रिया अविरत सुरू ठेवू, खा. प्रितमताई मुंडे यांची देवडीत ग्वाही ; पन्नास लाखांच्या विकास कामांचे केले उदघाटन

वडवणी । दि २५ ।
वडवणी तालुक्यातील जनतेने मुंडे साहेबांना आणि त्यांच्या पश्चात आम्हाला भरभरून आशीर्वाद दिले आहेत. जनतेच्या याच प्रेम आणि आशीर्वादाचा बळावर जिल्ह्याच्या विकासाची प्रक्रिया अविरत सुरू ठेवू अशी ग्वाही खा. प्रितमताई मुंडे यांनी दिली. वडवणी तालुक्यातील देवडी इथे विविध विकासकामांच्या उदघाटन प्रसंगी त्या बोलत होत्या.

पर्यटन विकास व दलित वस्ती विकास निधी अंतर्गत वडवणी तालुक्यातील देवडी इथे पन्नास लक्ष रुपयांच्या विविध विकास कामांचे उदघाटन खा. प्रितमताई मुंडे यांनी केले. याप्रसंगी भाजप नेते रमेशराव आडसकर, जेष्ठ नेते राजाभाऊ मुंडे, तालुकाअध्यक्ष पोपटराव शेंडगे, मच्छिंद्र झाटे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

याप्रसंगी ग्रामस्थांशी संवाद साधताना खा. प्रितमताई मुंडे म्हणाल्या की वडवणी तालुका नेहमीच आमच्या पाठीशी भक्कमपणे उभा राहिला आहे. जनतेच्या या आशीर्वादाची परतफेड करणे शक्य नाही.परंतु त्यांना अपेक्षित असलेले कार्य उभे करत आहोत. कोरोना काळातही जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात पोहोचून आपल्या लोकांना दिलासा मिळावा याकरिता मी प्रयत्नशील होते. जनतेच्या हिताची आणि विकासाची कामे आम्ही करत आहोत. सर्वसामान्यांचे आशीर्वाद पाठीशी राहिले तर येणाऱ्या काळातही विकास कामांमध्ये सातत्य ठेवू. तसेच आपल्या भागातील प्रलंबित प्रश्न देखील भविष्यात मार्गी लावू अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.

••••

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!