Uncategorized

जिल्ह्यातील 197 पोलिस कर्मचार्‍यांच्या बदल्या, दोन दिवसात ऑर्डर मिळणार



बीड, दि. 18 (लोकाशा न्यूज) : सध्या पोलिस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी पोलिस कर्मचार्‍यांच्या बदल्यांची प्रक्रिया हाती घेतली आहे. त्यानुसार बुधवारी जिल्ह्यातील 105 पोलिस कर्मचार्‍यांच्या प्रशासकिय बदल्या करण्यात आल्या तर दुसर्‍या दिवशी 92 कर्मचार्‍यांच्या प्रशासकिय बदल्या करण्यात आल्या. प्रशासकिय बदल्या झालेल्या पोलिस कर्मचार्‍यांना दोन दिवसात ऑर्डर दिली जाणार आहे. तर पुढच्या आठवड्यात पोलिस कर्मचार्‍यांच्या विनंती बदल्या केल्या जाणार आहेत, अशी माहिती पोलिस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी दिली आहे.
एकाच ठिकाणी पाच वर्षांचा कार्यकाळ पुर्ण करणार्‍या पोलिस कर्मचार्‍यांच्या प्रशासकिय बदल्यांची प्रक्रिया पोलिस अधीक्षकांनी हाती घेतलेली आहे, याअनुषंगानेच संबंधित पोलिस कर्मचार्‍यांकडून तीन पर्याय सुचवावेत, असे आवाहन केले होते, त्यानुसार बदल्यांची ही प्रक्रिया बुधवारपासून  सुरू झाली. पहिल्या दिवशी 105 तर दुसर्‍या दिवशी 92 पोलिस कर्मचार्‍यांच्या प्रशासकिय बदल्या करण्यात आल्या. ज्या पोलिस कर्मचार्‍यांच्या प्रशासकिय बदल्या करण्यात आल्या आहेत. त्यांना दोन दिवसात नवी ऑर्डर दिली जाणार आहे. तसेच पुढच्या आठवड्यात विनंती बदल्या करण्यात येणार आहेत.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!