बीड

जिल्ह्यात बिघडलेल्या कायदा व सुव्यवस्थेवर सत्ताधारी आमदारांची लक्षवेधी, लक्षवेधीमुळे कुणाची होणार गोची, सरकारच्या निर्णयाकडे जिल्ह्याचे लक्ष


बीड, दि. 4 (लोकाशा न्यूज) ः जिल्ह्यातील वाळूबळी, देवस्थान जमीन घोटाळा, जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात झालेला गोळीबार आणि एकंदरच बिघडलेल्या कायदा सुव्यवस्थेवर आज विधानसभेत चर्चा होणार आहे. आ. प्रकाश सोळंके, आ. संदीप क्षीरसागर, आ. बाळासाहेब आजबे यांनी दिलेली लक्षवेधी सुचना स्विकारण्यात आली असून त्यावर आता सरकार काय उत्तर देते याकडे सर्वांच्या नजरा असतील.
बीड जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्थेचे मागच्या काही काळात तीनतेरा वाजले आहेत. वाढती गुन्हेगारी त्यासोबतच वाळूमाफियांचा धुमाकूळ, जिल्ह्यात गेलेले वाळूबळी, देवस्थान जमिनीचे घोटाळे आणि त्याचा धिम्यागतीने होणारा तपास यासह जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात झालेला गोळीबार असे सारे प्रश्न विधीमंडळात उपस्थित करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे बीड जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्याच तीन आमदारांनी ही लक्षवेधी उपस्थित केली आहे. आतापर्यंत जिल्ह्यात माफियाराज असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात होता. माजी मंत्री पंकजाताई मुंडे या संदर्भात टिका केली होती. पण आता राष्ट्रवादीचे आमदार असलेल्या प्रकाश सोळंके, संदीप क्षीरसागर आणि बाळासाहेब आजबे यांनीच हा प्रश्न उपस्थित केला आहे. त्यामुळे उत्तर देताना सत्ताधार्‍यांचीही गोची होणार आहे.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!