माजलगाव, दि. 1 (लोकाशा न्यूज) : माजलगाव, धारुर तालुक्यातील आत्महत्याग्रस्त शेतकर्यांच्या वारसास नाम फाउंडेशनच्या वतीने मंगळवारी प्रत्येकी 25 हजार रुपये या प्रमाणे 22 शेतकर्यांच्या वारसांना नामचे मराठवाडा समन्वयक राजाभाऊ शेळके यांच्या हस्ते 5 लाख 50 हजाराच्या धनादेशाचे वाटप करण्यात आले.
विवीध सामाजिक कार्यात कायम अग्रेसर असलेल्या नाना पाटेकर, मकरंद अनासपुरे यांच्या नाम फाउंडेशनच्या माध्यमातुन महाराष्ट्रातील आत्महत्याग्रस्त शेतकर्यांच्या कुटुम्बांना आधार म्हणुन प्रत्येकी 25 हजार रुपये देण्यात येतात.मंगळवार पासुन मराठवाड्यातील दोन हजार आत्महत्याग्रस्त शेतकर्यांच्या कुटुम्बियांना मदत देण्यात येत असून गरजु पाल्यांची शिक्षणाची आर्वी येथील निवासी विद्यालयात सोय केली जाते.मंगळवारी जिल्ह्यातील माजलगाव,धारुर या तालुक्यातील आत्महत्याग्रस्त 22 शेतकर्यांच्या वारसांना नामचे मराठवाडा समन्वयक राजाभाऊ शेळके,पञकार महेंद्र मस्के,रत्नाकर कुलथे,दत्ता येवले,प्रकाश उजगरे,माजलगाव नाम समन्वयक योगेश शिंदे,भैया निसर्गंध यांच्या उपस्थितीत वारसांना धनादेशाचे वाटप करण्यात आले. या मदतीमुळे अनेक निराधार बहिणीच्या चेहर्यावर समाधान फुलले असुन या कुटुम्बांना नाम तर्फे सर्वोत्तपरी मदत देण्याचे यावेळी शेळके म्हणाले मराठवाड्यातील संपुर्ण जिल्ह्यात या धनादेशाचे वारसांना वाटप सुरु करण्यात आल्याचेही राजाभाऊ शेळके यांनी यावेळी सांगितले.