पाटोदा

पैशाच्या देवाण-घेवाणीवरून व्यसनी मुलाने बापाला जिवंत मारले, अंत्यविधी करून पुरावाही केला नष्ट,पाटोदा तालुक्यातील पारनेर येथील धक्कादायक घटना, पाच आरोपींवर खूनाचा गुन्हा दाखल करून आरोपींना केले अटक


संजय सानप
पाटोदा, दि. 24 : बँकेच्या पैशाच्या देवाण-घेवाणीवरुन पोटच्या मुलाने बापाला जबर मारहाण करून खुन केला तसेच चुलतभावाच्या मदतीने अंत्यविधी करुन पुरावा नष्ट केल्याची धक्कादायक घटना पाटोदा तालुक्यातील पारनेर येथे घडली आहे. या गुन्हासंदर्भात पाच आरोपी विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
चौसाळा येथील मुलाने जन्मदात्याला मारल्याच्या दुर्दैवी घटनेनंतर खळबळ उडाली आहे. पाटोदा तालुक्यातील पारनेर येथे व्यसनी मुलाने बँकेच्या पैशाच्या देवाणघेवाणीवरुन बापाला मारले. आरोपी योगेश महादेव औटे याच्या मारहाणीत महादेव औटे (वय 55) हे जागीच गतप्राण झाले. ही घटना दि. 23 रोजी घडली. वडिलांचा मृत्यू झाल्यानंतर भाऊ गणेश महादेव औटे, विष्णु बलभिम औटे, वाल्मिकी बलभिम औटे, परमेश्वर बलभिम औटे यांनी संगणमत करुन पार्थिवावर अंत्यसंस्कार करुन पुरावा नष्ट केला. या प्रकरणी पोलिस हवालदार आदिनाथ तांदळे यांच्या फिर्यादीवरून पाटोदा पोलिस ठाण्यात गु. र. 159/21 भादवी 302, 201, 34 अ कलमान्वये गुन्हा नोंद करण्यात आला. आष्टी पोलिस उपविभागीय अधिकारी विजय लगारे व पोलिस निरीक्षक मनिष पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय धरणीधर कोळेकर, पो. ह. आदीनाथ तांदळे हे तपास करत आहेत.

निनावी फोनने फुटले बिंग
सौताडा बीटचे अमलदार आदिनाथ तांदळे यांना एक निनावी फोन आल्यानंतर या घटनेला वाचा फुटली. एपीआय धरणीधर, कोळेकर यांच्या नेतृत्वाखालील पोलिसांच्या पथकाने पारनेर येथे जाऊन चौकशी करुन गुन्हा दाखल करुन आरोपींना अटक केली.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!