परळी

गुंगीचे औषध देवून महिलेवर बलात्कार, परळीच्या धर्मापुरीमधील धक्कादायक घटना, नराधामावर गुन्हा दाखल


परळी, दि. 27 (लोकाशा न्यूज) : असाह्य महिलेवर गुंगीचे औषधं बळजबरीने खाऊ घालून अत्याचार केल्याची घटना रविवारी दि. 25 रोजी तालुक्यातील धर्मापुरी येथे घडली. या प्रकरणी परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
याबाबतीत पोलीस सूत्रांकडून प्राप्त माहिती अशी की, तालुक्यातील धर्मापुरी येथील 40 वर्षीय महिला आपल्या पतीच्या निधनानंतर 2 मुले व 1 मुलगी यांचा मजुरी करून सांभाळ करते. याच असहायतेचा फायदा घेत गल्लीतील 27 वर्षीय युवक अफसर शेख याने रविवारी दुपारी 4 च्या सुमारास पीडित महिलेच्या घरात बळजबरीने प्रवेश करून मारहाण करीत गुंगीच्या गोळ्या खाऊ घालून जबरी अत्याचार केला. या प्रकरणी पीडित महिलेच्या फिर्यादीवरून परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात कलम 376,452,323 भादवीनुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे. अधिक तपास पोउपनि पवार हे करीत आहेत.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!