बीड

दहा हजाराची लाच घेताना महावितरणच्या उपव्यवस्थापकास एसीबीने रंगेहाथ पकडले, अहवाल चांगला देण्यासाठी मागितली होती लाच


बीड, दि. 6 (लोकाशा न्यूज) : दहा हजाराची लाच स्विकारताना राज्य विद्युत वितरण विभागाच्या उपव्यवस्थापकास रंगेहाथ पकडले आहे. ही कारवाई मंगळवारी बीड एसीबीने केली आहे. अहवाल चांगला देण्यासाठी त्या लाचखोराने 11000 हजार रूपयांची लाच मागितली होती, तडजोडीअंती दहा हजार रूपये देण्याचे ठरले होते.

भुपाळ मधुकर बेडेकर (वय 51 ह.मु.रा. गिराम नगर बीड, का. पत्ता चेतना नगर, चौबे हॉस्पीटल समोर औरंगाबाद) असे लाच घेताना पकडण्यात आलेल्या उपव्यवस्थापकाचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी, की 1 जुलै रोजी तक्रारदारांनी एसीबीकडे एक तक्रार दाखल केली होती. तक्रारादाराच्या विरूध्द सुरू असलेल्या चौकशीमध्ये सहकार्य करून चांगला अहवाल देण्यासाठी राज्य विज वितरण कंपनीचे (बीड) उपव्यवस्थापक भुपाळ बेडेकर यांनी तक्रारदाराकडे 11 हजार रूपयांची लाच मागितली होती. तडजोडीअंती दहा हजार देण्याचे ठरले होते. मुळात मात्र लाच देण्याचीच ईच्छा नसल्यामुळे तक्रारदारांनी यासंदर्भात एसीबीकडे तक्रार केली होती. त्यानुसार तक्रारदाराकडून दहा हजाराची लाच घेताना मंगळवारी भुपाळ बेडेकर यांना रंगेहाथ पकडण्यात आले. याबाबत शिवाजीनगर पोलिस ठाण्यात बेडेकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई एसीबीचे पोलिस अधीक्षक डॉ. राहूल खाडे, प्रभारी अप्पर पोलिस अधीक्षक मारूती पंडित, डीवायएसपी बाळाकृष्ण हानपुडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक रविंद्र परदेशी, पोलिस अंमलदार श्रीराम गिराम, भरत गारदे, मोरे यांनी केली.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!