केज

केजमध्ये महिलेवर बलात्कार, गुन्हा दाखल करून केज पोलिसांनी आरोपीला ठोकल्या बेड्या

केज दि .4 – शेतातून घरी येत असलेल्या महिलेला वाटेत एका जीपमध्ये बळजबरीने बसून नेत गावाच्या शिवारात अत्याचार केल्याची घटना केज पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली असून पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे . याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे . केज तालुक्यातील एका गावातील 30 वर्षीय विवाहित महिला ही 2 जुलै रोजी सायंकाळी शेतातून एकटीच घरी येत होती . आरोपी फुलचंद रामभाऊ गायकवाड ( रा . घाटेवाडी ता . केज ) याने महिलेला जीपमध्ये बळजबरीने बसवून घाटेवाडी शिवारातील शिंदे नामक शेतकऱ्याच्या शेतात नेवुन तिच्या इच्छेविरुद्ध अत्याचार केला . झालेला प्रकार कोणाला सांगितला तर तुला , तुझा नवरा व मुलांना जिवे मारुन टाकीन अशी धमकी दिली . अशी फिर्याद पिडीत महिलेने 4 जुलै रोजी दिल्यावरुन आरोपी फुलचंद गायकवाड याच्याविरुध्द केज पोलिसात बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे . पोलिसांनी गुन्हा दाखल होताच आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत . पुढील तपास फौजदार सीमाली कोळी या करीत आहेत .

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!