बीड

उत्तर प्रदेशमधील बेकायदेशीर धर्मांतरण प्रकरणाचे बीड कनेक्शन, तिघांना अटक; अटकेत बीडच्या इरफानचा समावेश


बीड, दि. 28 (लोकाशा न्यूज):- मागच्या आठ ते दहा दिवसांपासून उत्तर प्रदेशमधील बेकायदेशीर धर्मांतरण प्रकरण चांगलेच गाजत आहे. आता या प्रकरणाचे कनेक्शन बीडपर्यंत येऊन पोहचले आहे. कारण या प्रकरणातील एक आरोपी बीड येथील रहिवासी असून तो केंद्र शासनाच्या महिला व बालकल्याण विभागात कर्मचारी असल्याचे समोर येत आहे.
   इरफान शेख (रा. बीड) असे पोलिसांनी अटक केलेल्या कर्मचार्‍याचे नाव आहे. मुकबधिर विद्यार्थ्यांना आमिष दाखवून त्यांचे धर्मांतरण केले जात असल्याचे प्रकरण उत्तर प्रदेशमध्ये उघडकीस आले होते. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास गतीने सुरू केला. मागच्या काही दिवसांपुर्वीच या प्रकरणात केंद्रीय मंत्रालयात काम करणार्‍या एका अधिकार्‍यालाही गजाआड केले होते. आता या प्रकरणाचे कनेक्शन थेट बीडपर्यंत येऊन पोहचल्याचे समोर येत आहे. कारण सोमवारी या प्रकरणात पोलिसांनी आणखी तिघांना अटक केली आहे. यामध्ये गुरगाव (उत्तर प्रदेश) मन्नू यादव तसेच दिल्ली येथील राहुल भोला आणि बीड येथील इरफान शेख या तिघांचा समावेश आहे. इरफान शेख हा केंद्रीय मंत्रालयात महिला व बालकल्याण विभागातील कर्मचारी असल्याचे समोर येत आहे. 

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!