वडवणी

कार आणि ट्रॅव्हल्सच्या भीषण अपघातात ग्रामसेवक राजेंद्र मुंडे जागीच ठार


वडवणी : भरधाव वेगतील खासगी ट्रॅव्हल्सची समोरासमोर जोरदार धडक झाली . या MHD2CP 5226 अपघातात कारमधील ग्रामसेवक राजेंद्र मुंडे यांचा जागीच मृत्यू झाला . हा अपघात बुधवारी ( १६ जून ) पहाटे वडवणी जवळ परळी बीड महामार्गावर झाला.
राजेंद्र मुंडे हे सध्या हे बीड पंचायत समितीत कार्यरत होते . बुधवारी पहाटे ते काही कामानिमित्त कारमधून ( एमएच ०२ सिपी ५२२६ ) निघाले होते . ते परळी बीड रस्त्यावर देवडीजवळ असताना पुण्यावरून परळीकडे जाणाऱ्या ट्रॅव्हल्सने ( एमएच २ ९ व्ही ७२२७ ) त्यांच्या कारला समोरून जोरदार धडक केली . या अपघातात राजेंद्र मुंडे यांचा जागीच मृत्यू झाला . घटनेची माहिती मिळताच वडवणी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली . पंचनामा करुन मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी वडवणी येथील शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आला . हा अपघात एवढा भीषण होता की यामध्ये कारचा चुराडा झाला .

error: Content is protected !!