बीड

कामगार, कर्मचार्‍यांच्या सुरक्षिततेसाठी पुन्हा नगराध्यक्ष धावले, कोरोना प्रतिबंधात्मक किटचे सकाळी होणार वाटप, 20 हजार नागरिकांना फायदा होणार


बीड, दि. 20 (लोकाशा न्यूज) : करोना महासाथीच्या आजारावर नियंत्रण मिळवण्यासाठी बीड नगर पालिकेच्या वतीने विविध पातळीवर प्रयत्न सुरू आहेत.शहरात वाढती रुग्ण संख्या लक्षात घेऊन नगराध्यक्ष डॉ भारतभूषण क्षीरसागर यांनी न प चे कर्मचारी, स्मशानभूमीत काम करणारे लोक,तसेच आर्थिक दृष्टया मागासलेल्या नागरिकांसाठी कोरोना प्रतिबंधात्मक साहित्याची तातडीने व्यवस्था केली आहे याचे वाटप आज दि 21 मे रोजी पासून वाटप करण्यात येत आहे,यामुळे या प्रक्रियेत काम करणारे कर्मचारी सुरक्षित राहतील याची काळजी घेतली जात आहे.
करोना महामारीच्या काळात बीड नगर पालिकेने आपले मोठे योगदान नोंदवले आहे,शहरातील कोविड सेन्टर मध्ये सर्व सुविधा पुरवण्याचे काम नगर पालिका करते,जवळपास 14 महिन्यापासून हे कार्य अविरतपणे चालू आहे, आजच्या परिस्थितीत कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होऊ लागला आहे, प्रत्येक ठिकाणी न प चे कर्मचारी काम करतात, त्यांनाही सुरक्षेच्या दृष्टीने काळजी म्हणून नगर पालिकेच्या वतीने कोरोना प्रतिबंधात्मक साहित्याची आवश्यकता होती नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांनी आजची स्थिती लक्षात घेऊन कामगार कर्मचारी आणि आर्थिक दृष्टया मागासलेल्या नागरिकांसाठी ज्यांच्या घरी प्रत्येकी 5 व्यक्ती गृहीत धरून 4000 हजार कोरोना फॅमिली किट ज्यात मास्क, ग्लोज,सॅनिटायझर हे साहित्य असेल असे 20 हजार नागरिकांना याचा लाभ होणार आहे तसेच 600 थर्मलगण,600 ऑक्सिमिटर,2500 पीपीइ किट,2000 नॉन डीसपोझेबल किट,4000 फॅमिली कोरोना किट ज्यात मास्क, ग्लोज,सॅनिटायझर हे साहित्य नगराध्यक्ष डॉ भारत भूषण क्षीरसागर यांच्या हस्ते ज्या गोरगरिबांना आज दि 21 मे पासून वाटप करण्यात येणार आहेत आहेत,कोरोना काळात न प चे सफाई कर्मचारी यांच्या सुरक्षेची पूर्ण काळजी घेतली आहे,तर स्मशानभूमीत काम करणारे लोकांना देखील या साहित्याचे वाटप करण्यात आले,अग्निशमन विभागातील तसेच फवारणी ची कामे करणारे कर्मचारी यांना देखील या सुरक्षा साहित्याचे वापर नगराध्यक्ष डॉ भारतभूषण क्षीरसागर यांच्या हस्ते आजपासून करण्यात येणार आहे यावेळी मुख्याधिकारी डॉ उत्कर्ष गुट्टे यांच्या सह नगरसेवकआदि उपस्थित राहतील

चौकट
शहरात सध्या शासकीय रुग्णालयात लसीकरण मोहीम सुरू आहे सध्या चंपावती विद्यालयात सोय करण्यात आली आहे याठिकाणी जेष्ठ नागरिक तसेच अन्य नागरिक यांना बसण्यासाठी आसन व्यवस्था आणि पिण्याच्या पाण्याची सोय स्व काकू नाना प्रतिष्ठान च्या वतीने करण्यात येणार आहे जेव्हा जेव्हा लस उपलब्ध असेल व लसीकरण सुरू राहील तेव्हा ही व्यवस्था होणार आहे.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!