परळी

अपमान जिव्हारी लागल्यानेच सासूने केली आत्महत्या, परळीतील घटना : डॉक्टर जावयासह चौघांवर गुन्हा दाखल


परळी : शहरातील विद्यानगर भागातील महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना तीन आठवड्यापूर्वी उघडकीस आली होती . जावई आणि त्याच्या कुटुंबियांकडून झालेला अपमान जिव्हारी लागल्यानेच आईने आत्महत्या केल्याचा आरोप मुलीने केल्याने प्रकरणी डॉक्टर जावयासह चौघांवर शनिवारी ( दि .१५ ) परळी शहर पोलिसांत गुन्हा दाखल झाला .

पोलिसांच्या माहितीनुसार , नमिता अमोल रकटे ( २ ९ , रा.पिंपळे सौदागर , पुणे , हमु विद्यानगर , परळी ) हिने फिर्याद दिली . त्यानुसार , नमितीचा विवाह डॉ.अमोल रकटेशी झाला होता . मात्र , लग्नात नमिता व माहेरच्या लोकांना सासरच्या मंडळींनी खोटी माहिती देऊन दिशाभूल केली . लग्नानंतर नमिताची आई सुशीला विश्वनाथअप्पा बेंबळगे ( ६० , रा.विद्यानगर , परळी ) यांचा सतत अपमान केला . ‘ तुम्ही लग्नात दिलेले स्त्रीधन तळतळाट करुन दिल्याने आमच्या घरावर दैवी कोप झाला आहे , त्यामुळे पुन्हा दोन लाख व एक सोन्याची अंगठी द्या ‘ अशी मागणी केली गेली . शिवाय सुशीला यांच्यासह त्यांचे पती व मुलगा यांना जावई डॉ . अमोल याच्या पाया पडण्यास भाग पाडले . शिवाय चारित्र्याबद्दल संशय घेऊन सतत अपमानित केले . त्यामुळे सुशीला बेंबळगे यांनी २० एप्रिल रोजी गळफास घेऊन आत्महत्या केली . नमिता रकटे हिच्या फिर्यादीवरुन शनिवारी पती डॉ.अमोल शरणआप्पा रकटे , सासू जयश्री शरणआप्पा रकटे , सासरा शरणआप्पा विश्वनाथआप्पा रकटे , नणंद श्रूती शरणआप्पा रकटे यांच्याविरुध्द आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा नोंद करण्यात आला.तपास सहायक निरीक्षक जी.बी.पालवे करत आहेत .

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!