आष्टी

सेवानिवृत्त अभियंता शिवाजीराव चव्हाण यांचे निधन


आष्टी, दि. 15 (लोकाशा न्यूज) : सार्वजनिक बांधकाम विभागाचे सेवानिवृत्त अभियंता शिवाजीराव काकासाहेब चव्हाण (रा.डोईठाण ता.आष्टी) यांचे शनिवारी (ता.15 मे) दुपारी चार वाजता र्‍हदयविकाराच्या तिव्र धक्क्याने निधन झाले. मृत्यू समयी त्यांचे वय 66 वर्ष होते. बीड, आष्टी आणि पाटोदा याठिकाणी त्यांनी अंत्यत चांगल्या पध्दतीने आपले कर्तव्य बजावले होते. त्यांच्या अशा अचाणक जाण्याने डोईठाणसह आष्टी तालुक्यातून हळहळ व्यक्त केली जात आहे. शनिवारी सायंकाळी त्यांच्या पार्थिवावर डोईठाण येथील शेतात अंत्यविधी करण्यात आला. त्यांच्या पश्‍चात पत्नी, एक मुलगा, सुन, दोन मुली, जावाई, भाऊ, नातवंडे असा मोठा परिवार आहे. चव्हाण कुटूंबियांच्या दुख:त दै.लोकाशा परिवार सहभागी आहे.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!