अंबाजोगाई

अंबाजोगाईतील कोविड सेंटरकडे प्रशासनाचे दुर्लक्ष, इंजेक्शन, औषध गोळ्याही वेळेवर मिळेनात, आ. नमिता मुंदडांची जिल्हाधिकार्‍यांसह आरोग्य मंत्र्यांकडे तक्रार


अंबाजोगाई, दि. 4 (लोकाशा न्यूज) : रूग्ण संख्या अधिक असतानाही अंबाजोगाईतील कोविड सेंटरकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे, कारण याठिकाणच्या रूग्णांना लागणारे इंजेक्शन आणि औषध गोळ्याही वेळेवर मिळत नाहीत, याची तक्रारी आ. नमिता मुंदडा यांनी जिल्हाधिकारी रविंद्र जगताप यांच्यासह राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याकडे केली आहे.
टोपे यांना दिलेल्या पत्रात आ. मुंदडा यांनी म्हटले आहे, की लोखंडी सावरगाव येथील दोन्ही कोविड रूग्णालयांमध्ये जवळपास 700 रूग्ण उपचार घेत आहेत. सदर दोन्ही रूग्णालयात मागच्या दोन दिवसांपासून रेमडीसीवर इंजेक्शन आणि टॅब फॅबीप्लू गोळ्या उपलब्ध नाहीत, त्यामुळे रूग्णांना रेमडीसीवर आणि टॅब फॅबीप्लूूचा डोस बंद आहे. जिल्हा शल्य चिकीत्सकांचे लोखंडी सावरगावच्या दोन्ही कोविड रूग्णालयाकडे दुर्लक्ष आहे. सदर रूग्णालयात इतर आजारांची औषधेही उपलब्ध नाहीत, व पुरवठा होत नाही, तरी रेमडीसीवर इंजेक्शन, टॅब फॅबीप्लू गोळ्या व इतर औषधे त्वरीत उपलब्ध करून द्यावीत, अशी मागणी आ. मुंदडांनी केली आहे. त्याचबरोबर त्यांनी जिल्हाधिकारी रविंद्र जगताप यांच्या कानावरही बर्‍याच बाबी घातल्या आहेत. अंबाजोगाईतील स्वामी रामानंद तिर्थ वैद्यकिय महाविद्लय व रूग्णालय तसेच लोखंडी सावरगाव येथील दोन्ही कोविड रूग्णालयात कोरोना रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने इतर औषधासोबत ‘टोसिलीझूमॅब’ या इंजेक्शनची मागणी मोठ्या प्रमाणात आहे. आयुक्त, अन्न व औषध प्रशासन, मुंबई यांच्या 2 मे चा पत्रान्वय सदर इंजेक्शन साठा जिल्ह्यातील रूग्ण संख्या पाहता आपल्या स्तरावर उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. तरी स्वामी रामानंद तिर्थ वैद्यकिय महाविद्यालय व रूग्णालय अंबाजोगाई व लोखंडी सावरगाव येथील दोन्ही कोविड रूग्णालयात रूग्णांच्या तुलनेनुसार ‘टोसिलीझूमॅब’इंजेक्शन त्वरित उपलब्ध करून देण्यात यावे, अशी मागणी आ. मुंदडांनी जिल्हाधिकार्‍यांकडे केली आहे.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!