Uncategorized

आ.संदीप भैय्या क्षीरसागर यांची मध्यस्ती, काम बंद आंदोलन अखेर स्थगित ! रुग्णांची सेवा निरंतर सुरू राहणार; अधिपरिचारीका, कर्मचार्‍यांच्या प्रश्नांची सोडवणूक, रुग्णांच्या सेवेत दिरंगाई नको,अडचणी असल्यास थेट संपर्क करा-आ.संदीप क्षीरसागर


बीड, दि. 18 (लोकाशा न्यूज) : जिल्हा रुग्णालयात अधिपरिचरीका व इतर कर्मचारी यांनी काम बंद आंदोलनाचा इशारा देत आपल्या व्यथा,अडचणी,प्रश्न आ.संदीप भैय्या क्षीरसागर यांच्या कानी टाकल्या होत्या. यावर आ.संदीप भैय्या क्षीरसागर यांनी मध्यस्ती करत अधिपरिचारीक व इतर कर्मचारी यांच्या प्रश्नांची सोडवणूक करत आधार दिला. जिल्हा रुग्णालयात मनुष्यबळ वाढवून स्वच्छता व सुरक्षा याबाबत दिरंगाई नको, कामाची विभागणी करून रुग्णांना सेवा द्या, करोनाला हरवण्यासाठी सर्वांनी मिळून लढल पाहिजे, तुम्हाला कोणी त्रास देत असेल तर थेट संपर्क करा असे आवाहन आ.संदीप क्षीरसागर यांनी केले आहे. आ.संदीप भैय्या क्षीरसागर यांच्या मध्यस्तीने जिल्हा रुग्णालयातील कर्मचार्‍यांनी आंदोलन स्थगित केल्याने रुग्णांची सेवा निरंतर सुरू आहे.
बीड जिल्ह्यात करोना रुग्णांची संख्या जास्त प्रमाणात वाढू लागली आहे. जिल्हा रुग्णालयात या परिस्थितीचा आ. संदीप भैय्या क्षीरसागर यांनी आढावा घेऊन अनेक प्रश्न मार्गी लावले. सलग दोन दिवस झाले आ.संदीप क्षीरसागर कोरोना बाधित रुग्णांचे प्रश्न सोडवत जिल्हा रुग्णालयात आहेत. या दरम्यान अधिपरिचारीका यांच्या संघटनांनी निवेदन देवून काम बंद आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. त्यावर रविवार दि.18 एप्रिल 2021 रोजी जिल्हा रूग्णालयात समन्वय बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.सुर्यकांत गिते, आरएमओ सुखदेव राठोड, डॉ.हुबेकर, धिंडकर मॅडम यांच्यासह आदी कर्मचार्‍यांची उपस्थिती होती. यावेळी अधिपरिचारीका यांच्यावर अतिरिक्त कामाचा भार लादला जात होता. त्याचबरोबर वॉर्ड बॉय, सुरक्षा रक्षक व इतर कोणी सहकार्य करत नसल्याचे निवेदनात म्हटले होते. यावर समन्वय बैठकीतून आ.संदिप भैय्या क्षीरसागर यांनी तोडगा काढत वॉर्ड बॉय, स्वच्छता कर्मचारी, डाटा इंट्री ऑपरेटर यासह मनुष्यबळ वाढविण्याची प्रक्रिया जिल्हा रूग्णालय प्रशासनाने हाती घ्यावी यासाठी जिल्हाधिकारी,जिल्हा परिषद मुख्याधिकारी यांच्याशी संवाद साधून दोन्ही प्रश्न मार्गी लावले आहेत.. सुरक्षा रक्षक आपले कर्तव्य प्रामाणिक पार पाडत नसल्याच्या बाबी समोर आल्यानंतर त्यांनाही चांगलीच तंबी आ.संदिप भैय्या क्षीरसागर यांनी देवून आपले कर्तव्य निभवावे असे सुनावले आहे. यावेळी अधिपारिचारीका संघटनेचे सदस्य, अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. बीड जिल्हा रूग्णालयातून उसनवारी तत्त्वावर खासगी रूग्णालयातील कोव्हिड बाधीत रूग्णांना रेमडीसीवर इंजेक्शन दिले. हे रेमडीसीवर इंजेक्शन देत असतांना संबंधित रूग्णालयाकडून अर्ज व विहित नमुन्यातील फॉर्म भरून घेतला जातो. परंतू हा फॉर्म भरून घेण्यासाठी एचआरटीसी रिपोर्ट, आधार कार्ड व इतर कागदपत्रे जोडून द्यावी लागत आहेत. लॉकडाऊनमुळे झेरॉक्स दुकान बंद असून या कागदपत्राच्या झेरॉक्स काढण्यासाठी रूग्णांच्या नातेवाईकांची तारांबळ होत आहे. परिणामी मोठी गर्दीही जिल्हा रूग्णालय व ट्रेनिंग सेंटरमध्ये होते. यावर आता मेलवरती किंवा जिल्हा रूग्णालयातील हेल्प लाईन क्रमांकावर व्हाटसअ‍ॅपवरच रूग्णालयाचे अर्ज, विहित नमुण्यातील फॉर्म व एचआरटीसी रिपोर्ट मागवून पेपरलेस पद्धतीने रेमडीसीवरची प्रक्रिया राबवण्यात येणार असल्याचे या बैठकीनंतर जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.गित्ते यांनी म्हटले आहे. बीड जिल्ह्यात कोरोना रूग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढू लागली आहे. अँटीजेन, आरटीपीसीआर या चाचण्याही मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. बीड येथे घेण्यात आलेल्या चाचण्यांचे रिपोर्ट अंबाजोगाईला पाठवले जात आहेत. याचे रिपोर्ट येण्यास विलंब होवू लागल्याने बीड येथेच आरटीपीसीआर प्रयोग शाळा करण्याबाबतचा प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. सदर प्रयोग शाळा तातडीने व्हावी यासाठी आ.संदिप भैय्या क्षीरसागर, पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्यासह आधी मंत्र्यांकडे पाठपुरावा करणार आहेत. त्यांनी या बाबत फोनवरून मंत्र्यासोबत संवाद साधला असून लवकरच बीडमध्ये ही प्रयोग शाळा सुरू होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. जिल्हा रूग्णालयात काही जण विनाकारण लुडबुड करतात, रूग्णांना व्यवस्थित उपचार सुरू असतांना रेमडीसीवर इंजेक्शन द्या, हे उपचार करा, ते उपचार करा अशा चुकीच्या पद्धतीने दबाव टाकतात जे की अत्यंत चुकीचे आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार डॉ.रेमडीसीवर किंवा इतर उपचार लिहून देतात त्या पद्धतीने उपचार केले जातात. परंतू काही लुडबुड करणारे जाणीवपुर्वक त्रास देत असल्याची तक्रार कर्मचार्‍यांनी केली. यावर अशा त्रास देणार्‍या लोकांबाबत थेट पोलीसात द्या आम्ही तुमच्या सोबत आहोत अशी ग्वाही आ.संदिप क्षीरसागर यांनी कर्मचार्‍यांना दिली आहे.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!