बीड, दि.8 (लोकाशा न्युज) ः- वाढता कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून उपाययोजना म्हणून आता व्यापार्यांच्या अँटिजन टेस्ट केल्या जाणार आहेत. दि.15 मार्चपर्यंत जिल्ह्यातील सर्व दुकानदारांनी (व्यापार्यांनी) अँटिजन टेस्ट करून घ्यावी, टेस्टचा केली नसल्यास दुकान उघडता येणार नाही असे आदेश आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी रविंद्र जगताप यांनी सोमवारी दि.8 मार्च रोजी काढले आहेत.
व्यवसाय करण्यासाठी जिल्ह्यातील सर्व दुकानदारांना आता अँटिजन टेस्ट करणे बंधनकारक करण्यात आले आहेत. दि.15 मार्चपर्यंत सर्व दुकानदारांनी टेस्ट करून घ्यावी, जे दुकान टेस्ट न करता दुकान उघडतील अशा दुकानदारांवर थेट फोैजदारी कारवाई करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी जगताप यांनी म्हटले आहे.